तुमचा मोबाईल सतत हँग होतोय म्हणून त्रस्त आहात का? स्मार्टफोन सोडवण्यासाठी वापरा या स्मार्ट टिप्स..
Troubled by your mobile constantly hanging? Use these smart tips to solve smartphones
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा मोबाईल (Mobile) सध्या अविभाज्य भाग झाला आहे. मोबाईल हाताळत असताना सातत्याने हँग होत राहिल्यास आपली चिडचिड निर्माण होते, त्याचा सर्व त्रागा आपण मोबाईलवर ही करतो, मोबाईल हँग होतो म्हणून केअर सेंटरला (To the care center) वारंवार जाने परवडत देखील नाही, यासाठी आपला मोबाईल हँग होणार नाही अशी काळजी घेतल्यास हा मनस्ताप करावा लागणार नाही. चला तर आपण पाहुयात स्मार्ट फोन हँग (Hang) होवू नये यासाठी काय करता येईल.
मोबाईल हँग कशामुळे होतो?
सर्वप्रथम हे माहीत करून घेऊया की मोबाईल हँग कशामुळे होतो? तर मोबाईल हँग होण्याचे अनेक कारणे आहेत. महत्त्वाचे कारण म्हणजे फोन मध्ये ओवरलोड होणे.
अनेक मोबाईल अॅप्स एकाच वेळी चालविल्याने म्हणजे मल्टीटास्किंग (Multitasking) केल्याने मोबाईल हँग होऊ शकतो.
स्मार्टफोनचे इंटरनल स्टोरेज भरल्याने देखील बरेच स्मार्टफोन हळू हळू कार्य करतात आणि हँग होतात.
कॅशे फाईल्स न हटविण्यामुळे देखील मोबाईल स्लो आणि हँग होऊ शकतो.
कमी मेमरी आणि कमी रॅम (Low RAM) असलेल्या मोबाईल मध्ये हैवी अॅप्स वापरल्याने मोबाइल हँग होऊ शकतो.
मोबाइल मध्ये व्हायरस (Virus) आल्याने देखील मोबाइल हँग होऊ शकतो.
मोबाईल हँग होवू नये म्हणून काय काळजी घ्याल (Take care not to let the mobile hang)
तुम्ही जर Android फोन वापरत असाल तर सतत अपडेट करत राहा,अनावश्यक अॅप l डिलिट करा. नको असलेले मेसेज आणि कॉल लॉग डिलिट करा, त्यामुळे तुमच्या फोनला चांगला स्पीड मिळेल.
फोनचं स्टोरेज भरणार नाही याची काळजी घ्या. याशिवाय एका पेक्षा जास्त अॅप जर तुम्ही रनिंग करत असाल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो.
बऱ्याचदा अनेक स्मार्टफोनमध्ये लाईव्ह वॉलपेपर (Live wallpaper) सेट ऑप्शन असतो परंतु तो शक्यतो टाळा.शक्यतो एकच वॉलपेपर ठेवा त्याचा परिणाम मोबाईल परफॉर्मन्सवर होतो.
अनेकदा आपण न्यूज किंवा अनेक नोटिफिकेशन सुरू ठेवतो त्यामुळेही एकदम नोटिफिकेशन आले तर फोन हँग होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनावश्यक नोटिफिकेशन बंद करा.
मोबाईल मध्ये नको असणारा डेटा डिलीट (Delete data) करा, आपल्या फोनमध्ये स्पेस रिकामी ठेवा.
हे ही वाचा :
गुंतवणूकीपूर्वी ह्या गोष्टी लक्षात घ्या; चला तर वाचूया इन्वेस्टमेंट स्मार्ट टिप्स…
फेसबुकचे स्मार्टवॉच’ पाहिले आहे का? जाणून घ्या काय आहेत ‘या’ स्मार्टवॉच चे फीचर्स…