कृषी सल्ला

“या” बँकेमध्ये फाटलेल्या, जळालेल्या नोटा बदलून मिळणार; नोट परतावा नियम जाहीर..

पैशांचे अनेक व्यवहार (transaction) करताना घाई गडबडीत आपल्याकडून चुकून नोटांचे तुकडे पडले जातात. तुटलेले तुकडे पाहून आपण निराश होतो पण आता या फाटलेल्या नोटा सुद्धा घेतल्या जातात हे तुम्हाला माहीत आहेत का? फाटलेली नोट दुकानदाराने (shopkeeper) घेण्यास नाकारली तर तुम्हाला बँकेत (Bank) नेण्याचा आणि ती बदलण्याचा पूर्ण अधिकार (Rights) आहे. म्हणून बँकांमधील या फाटलेल्या नोटांच्या नियमांबद्दल (Torn note rules) तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. फाटलेल्या नोटा तुम्हाला सहज बदलून कसे मिळतील? याविषयी सविस्तर माहिती घेऊया..

वाचा – केंद्रसरकारने “या” डाळींच्या दराबाबत घेतला मोठा निर्णय; पहा निर्णयाबद्दल सविस्तर माहिती…

नोटांचा तुकडा पडून त्याच्या नंबर पॅनेलमधून जाऊ नये –

रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank) भाषेत काही फाटलेल्या नोटांना ‘सॉयल्ड नोट’ (Soiled note) म्हणतात. रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank) नियमांनुसार, ज्या नोटा 2 अंकांच्या आहेत, जसे की 10 ची नोट, जरी ती दोन तुकड्यांमध्ये असली तरी ती सॉयल्ड नोटेच्या (Soiled note) श्रेणीत ठेवली जाते. बँका (Bank) अशा नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाहीत. फक्त नोट कापून त्याच्या नंबर पॅनेलमधून जाऊ नये. या नोटा कोणत्याही सरकारी बँकेच्या काऊंटरवर सहज बदलल्या जाऊ शकतात.

वाचा- स्पिरुलिना शेती ठरेल शेतकऱ्याला फायदेशीर; पहा या शेतीची प्रक्रिया व काढणी..

फाटलेल्या नोटेचे तुकडे असतील तर काळजी करू नका-

एका नोटेचे अनेक तुकडे झाले तरी ते बँकेत नेले जाऊ शकतात. फाटलेल्या नोटेचा कोणताही भाग गहाळ झाला तरी त्याची देवाणघेवाण करता येते. कोणत्याही चलनी नोटवर आवश्यक भाग म्हणजे जारी करणार्‍या अधिकाऱ्याचे नाव, हमी, स्वाक्षरी, अशोक स्तंभ/महात्मा गांधी यांचे चित्र, वॉटर मार्क असणं गरजेचं आहे. जर या चिन्हांमध्ये काही विसंगती दिसली तर त्यासाठी काही पैसे द्यावे लागतील.

RBI चा नोट परतावा नियम –

ज्या नोटा पूर्णपणे फाटलेल्या आहेत, पूर्णपणे कापल्या आहेत किंवा संपूर्ण नोट जळली आहे, नंतर ती फक्त RBI च्या इश्यू ऑफिसमध्ये बदलली जाऊ शकते. बँकांच्या काऊंटरवर (bank counter) ते बदलता येत नाही. आरबीआयच्या (RBI) इश्यू विभागात या कामासाठी विशेष लोक नियुक्त केले जातात. आरबीआय (RBI) नोट परतावा नियम करण्यात आला आहे. अशा नोटा सरकारी बँकांच्या काउंटर, खासगी बँकांच्या चलन चेस्ट किंवा आरबीआयच्या (RBI) इश्यू ऑफिसमध्ये फॉर्म भरून देखील बदलल्या जाऊ शकतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button