कृषी सल्ला

टोमॅटो उत्पादकांच कंबरट मोडलं! टोमॅटो वर केल्याय या रोगाने हल्ला…

Tomato growers broke the cobwebs! Tomatoes attacked by this disease

एकीकडे कोरोना (Corona) सारखी भीषण परस्थिती, त्यामुळे राज्यातील बऱ्याच कृषी बाजार समिती (Agricultural Market Committee) बराच कालावधी पर्यंत बंद होत्या, त्यामुळे साहजिकच शेतमालाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर (farmers) अजून एक संकट कोसळले आहे ते म्हणजे टोमॅटो वर प्लॅस्टिक टोमॅटो’ (Plastic Tomato) या रोगाने शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे, बऱ्याच ठिकाणी टोमॅटोवर ( tomatoes) हा व्हायरस (Virus) उगवल्याचं शेतकरी सांगत आहेत.

हेही वाचा : एकच वनस्पती त्याचे दोन फायदे! जनावरांसाठी चारा आणि पिकांना खत म्हणून उपयुक्त जाणून घ्या; या वनस्पती बद्दल सर्व माहिती…

[metaslider id=4085 cssclass=””]

‘प्लॅस्टिक टोमॅटो’ या रोगामध्ये प्लॅस्टिक सारखं आवरण असून बुरशी सारखा (Like fungus) पसरतो. तब्बल दोन महिने झाले तरीही कृषी तज्ञांना यावर औषध मिळाले नाही. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी यांच्यावर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे, हातातोंडाशी आलेला घास प्लॅस्टिक टोमॅटो या रोगाने हिरावून घेत आहे.

हेही वाचा : एकच वनस्पती त्याचे दोन फायदे! जनावरांसाठी चारा आणि पिकांना खत म्हणून उपयुक्त जाणून घ्या; या वनस्पती बद्दल सर्व माहिती…

सध्या ‘प्लॅस्टिक टोमॅटो’ या रोगाचे नमुने कृषी विज्ञान केंद्राने बेंगलोरच्या आयआयएचआर संस्थेकडे (To IIHR) पाठविले आहेत. मात्र अद्याप हा व्हायरस कोणता आणि तो कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायला हव्या हे स्पष्ट झाले नाही. यातील जमेची बाजू म्हणजे मनुष्याने अथवा प्राण्यांच्या खाण्यात ते आलं तरी कोणताच धोका उद्भवणार नसल्याचा दावा तज्ज्ञांनी केलाय. पुणे जवळच्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यामध्ये हा प्लॅस्टिक टोमॅटो हा व्हायरस सापडला आहे, अशी माहिती एका वृत्त वाहिनी ने दिली आहे .

हेही वाचा :

1)कसं ओळखताल खतातील बनावटपणा; अतिशय सोप्या पद्दतीने ओळखा…

2) शेतात किटकनाशके, तणनाशके वापरतांना घ्यावयाची काळजी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button