एकाच झाडाला “टोमॅटो-वांगी” ही दोन फळे; या संशोधकांची भन्नाट कमाल पाहिली का? नवीन प्रयोगात मिळवले यश..
भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. शेती व्यवसाय (Farming business) पुढे नेण्यासाठी संशोधक नेहमी नवनवीन प्रयोग करत असतात. असेच आपण संशोधनातून केलेला अनोखा प्रयोग आपण पाहणार आहोत. वाराणसीतील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) शास्त्रज्ञांनी अशीच एक अनोखी गोष्ट विकसित केली आहे. कलम (Grafting) तंत्राद्वारे शास्त्रज्ञांनी अशी वनस्पती विकसित केली आहे, ज्याला एकाचं वेळी टोमॅटो आणि वांगी लागतील. त्यांनी या वनस्पतीला ‘ब्रिमॅटो’ (Brimato) असं नाव दिलं आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊया..
ग्राफटींग करून नवीनजात निर्माण केली –
वाराणसीतील आयसीएआर आणि भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेनं यापूर्वी ग्राफ्टिंग पोमॅटो (बटाटा-टोमॅटो) चं एकत्र उत्पादन घेण्यात यश मिळवलं होतं. त्यानंतर, त्यांनी आता ‘ब्रिमॅटो’ची (Brimato) झाडं विकसित केली आहेत. ‘IC 111056’ या वांग्याच्या वाणातील सुमारे 5 टक्के रोपांमध्ये दोन शाखा विकसित करण्याची प्रवृत्ती आहे. यांनी 25 ते 30 दिवसांची वांग्याची रोपं आणि 22 ते 25 दिवसांची टोमॅटोची रोपं यांचं ग्राफ्टिंग करून ब्रिमॅटो (Brimato) ही नवीन जात विकसित करण्यात आली आहे.
कलम असे केले जाते –
याचाच फायदा घेऊन स्प्लिस पद्धतीनं कलम केलं गेलं. मूळ वांगांच्या झाडाला तिरपा छेद देऊन (45 अंशाच्या कोनात) त्यात टोमॅटोची फांदी बांधून ग्राफ्टिंग केल्यानंतर (Grafting Technique) रोपांना 5 ते 7 दिवस नियंत्रित वातावरणात ठेवण्यात आलं. नंतर 5 ते 7 दिवस त्यांना समप्रमाणात सूर्यप्रकाश आणि सावली दिली गेली. वाराणसीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्चमधील शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कलम केलेल्या वनस्पतींचं ग्राफ्टिंग 15 ते 18 दिवसांनी शेतात लावण्यात आलं.
काळजी अशी घेतली –
वांगी (Brinjals) आणि टोमॅटोची (Tomato) संतुलित वाढ व्हावी यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात जास्त काळजी घेण्यात आली. शास्त्रज्ञांनी गरजेनुसार रोपाला खत दिलं. लावणीनंतर 60 ते 70 दिवसांनी एकाचं झाडाला टोमॅटो आणि वांगी लागली. ब्रिमॅटोच्या एका झाडापासून 2.383 किलो टोमॅटो आणि 2.64 किलो वांग्याचं उत्पादन मिळालं, अशी माहिती या शास्रज्ञांनी दिली. ग्राफ्टिंग तंत्रानं तयार केलेली वनस्पती कमी वेळेत आणि कमी जागेत जास्त भाजीपाला उत्पादन (Vegetable Production) देण्यात सक्षम आहे. जागेची कमतरता असलेल्या शहरी आणि उपनगरीय भागांसाठी ही बाब अतिशय उपयुक्त ठरू शकते, असं शास्त्रज्ञांच म्हणणं आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा