Tomato| टोमॅटोची किंमत पुन्हा वाढीच्या मार्गावर! 200 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता|
Tomato|: अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे टोमॅटोसह इतर भाज्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा परिणाम म्हणून बाजारात टोमॅटोच्या दरात वाढ होत आहे. सध्या दिल्लीत टोमॅटो 120 रुपये प्रति किलोने विकला जात आहे, तर काही शहरांमध्ये भाव 150 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.
पुरवठा कमी, भाव वाढीचा अंदाज:
तज्ज्ञांच्या मते, पुढील काही आठवड्यात टोमॅटोच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पावसामुळे टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्याने आणि पुरवठा घटल्याने भाव वाढत आहेत. याशिवाय, वाहतुकीतील अडथळे (Obstacles)आणि इंधनाच्या वाढत्या किमती यामुळेही टोमॅटो महाग होत आहे.
वाचा:FMCG Shares| शेअर बाजारात नवीन विक्रम! सेन्सेक्स आणि निफ्टीने केले नवीन शिखर गाठले, बँकिंग आणि FMCG शेअर्समध्ये जोरदार वाढ|
200 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता:
काही अंदाजांनुसार, टोमॅटोची किंमत 200 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकते. हे पेट्रोलच्या सध्याच्या किंमतीच्या दुप्पट आहे. गेल्या वर्षीही काही शहरांमध्ये टोमॅटो 200 रुपये किलोपर्यंत विकला जात होता.
सरकारी उपाययोजना:
टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सरकारने या समस्येवर उपाययोजना (measures) करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांमधून टोमॅटोची खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे बाजारात टोमॅटोचा पुरवठा वाढण्यास मदत होईल आणि भाव नियंत्रणात राहतील अशी अपेक्षा आहे.
टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे लोकांना मोठी आर्थिक कोंडी निर्माण होत आहे. सरकारने त्वरित आणि ठोस उपाययोजना करून टोमॅटोचे भाव नियंत्रणात आणणे गरजेचे आहे.