ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Update | राज्यात आज पाऊस पडण्याची शक्यता ! विदर्भासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बरसणार सरी

Weather Update| मान्सूनच्या आगमनामुळे संपूर्ण देशातील कमाल तापमानात घसरण व्हायला सुरुवात झाली आहे. यामुळे आगामी पाच दिवसांत तापमान ४ ते ५ अंशांनी कमी होईल. एवढंच नाही तर देशातील बहुतांंश राज्यांमध्ये वळवाचा पाऊस सुद्धा सुरू झाला आहे. विदर्भात आजपासून हलक्या पावसाला सुरुवात होत आहे. २३ मे २६ मे दरम्यान हा पाऊस पडू शकतो.

यंदाचा उन्हाळा सर्वाधिक उष्णतेचा

परंतु मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात फक्त २३ मे रोजीच पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यंदाचा उन्हाळा हा देशातील सर्वाधिक उष्णतेचा आहे आणि याच्या सर्वात जास्त झळा महाराष्ट्राला बसल्या आहेत. परंतु, यापासून येत्या काही दिवसांतच राज्याची सुटका होणार आहे.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

देशातील कमाल तापमानात घट

मान्सूनमुळे देशातील एकूणच वातावरण बदलून गेले आहे. उत्तर भारतामध्ये पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने जम्मू-काश्मीर आणि हिमालयात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. याशिवाय उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण देशातील कमाल तापमानात येत्या ५ दिवसांत ४ ते ५ अंशांनी घटणार आहे .

मान्सूनचा प्रवास

मान्सून सध्या बंगालच्या उपसागरात वेगाने पुढे जात आहे आणि लवकरच तो तामिळनाडूच्या दिशेने येत आहे. त्यामुळे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक किनारपट्टीवर पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या २८ मेपर्यंत मान्सून कर्नाटकात व ३ ते ४ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

महाराष्ट्रात वळवाचा पाऊस

१) विदर्भ : 23 ते 26 मे
२) मध्य महाराष्ट्र : 23 मे
३) कोकण : 23 मे
४) मराठवाडा : 23 मे

Todays weather update in maharshtra

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button