Weather Update | शेतकऱ्यांनो राज्यातील ‘या’ भागांत आज, उद्या बरसणार पावसाच्या सरी; जाणून घ्या सविस्तर
Farmers, it will rain today and tomorrow in these parts of the state; Know in detail
Weather Update | भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज आणि उद्या महाराष्ट्रातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. आज सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, अशी शक्यता आहे.
पावसाचा अंदाज
उद्याही सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
वाचा : Urine | आमदार- खासदार त्यांच्या फोटो वर गेवराई च्या लहान मुलांनी मुतून निषेध व्यक्त केला..
राज्यात कमाल तापमानात घट
सकाळच्या वातावरणात गारवा वाढला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडी जाणवत आहे. पश्चिमी चक्रावताची स्थिती सध्या हिमाचल प्रदेश आणि परिसरात समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे या भागात पाऊस पडत आहे. तर श्रीलंका आणि शेजारच्या किमोरिन भागात समुद्रपाटीपासून ०.९ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे केरळ, कर्नाटका, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागात पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरू शकतो. खरीप हंगामातील पिकांच्या वाढीस हा पाऊस मदत करेल.
हेही वाचा :
Web Title: Farmers, it will rain today and tomorrow in these parts of the state; Know in detail