Weather Update | राज्यात परतीच्या पावसाचा प्रवास सुरू! ‘या’ तारखेपासून मान्सून बाय-बाय करणारं; जाणून घ्या आताची पावसाची स्थिती
The return of rain to the state begins! Monsoon will be bye-bye from 'this' date; Know the current rainfall status
Weather Update | यंदा देशभरात मान्सून उशिराने दाखल झाला. महाराष्ट्रातही मान्सूनचा आगमन उशिराने झाल्यामुळे पावसाने (Weather Update) सरासरी गाठली नाही. आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, महाराष्ट्रातूनही 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून बाहेर पडेल, अशी माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे. देशभरात मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानपासून सुरू झाला. यंदा राजस्थानमधून मान्सून उशिरानेच परतला. आता राजस्थान, हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरातच्या काही भागांतून मान्सून परतला आहे.
मुसळधार पावसाची शक्यता नाही
राज्यात सध्या कुठेही मुसळधार पावसाची शक्यता नाही. रत्नागिरी- कोकणात आता मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी बाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्यामुळे राज्यात मान्सूनचा जोर कमी झाला आहे. येत्या 7 ऑक्टोबरपर्यंत हवामान खात्याने पावसाचा कोणताच इशारा दिलेला नाही. तसेच कुठे ऑरेंज अलर्ट दिलेला नाही.
सरासरीपेक्षा कमी पाऊस
मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. बीड जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाला आहे. बीडमध्ये मागील आठवड्यात झालेल्या पावसाने खरिपाच्या पिकांना आधार मिळाला. परंतु जिल्ह्यातील धरणांमध्ये अजूनही साठा झालेला नाही. यामुळे रब्बी हंगामही कसा असणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. माजलगाव धरणातून बीडला पाणीपुरवठा होतो. मात्र माजलगाव धरणातील पाणीसाठा कमी असल्याने बीड जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट कायम आहे.
वाचा : Monsoon Update | भारतीय हवामान विभागाकडून मान्सूनचा दुसरा अंदाज जाहीर ; राज्यात सरासरी ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता
राज्यात पावसाचे अपडेट
- राज्यातून तीन दिवसांत मान्सून परतण्यास सुरुवात होणार आहे.
- संपूर्ण महाराष्ट्रातून 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून परतणार असल्याचे पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.अनुपम काश्यपी यांनी सांगितले.
- राज्यात सध्या कुठेही मुसळधार पावसाची शक्यता नाही.
- रत्नागिरी- कोकणात आता मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे.
- राज्यात अजून अनेक जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली नाही.
- मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
- बीड जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाला आहे.
शेतकऱ्यांसाठी चिंतेची स्थिती
- राज्यात पावसाने सरासरी गाठली नाही.
- मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
- बीड जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाला आहे.
- जिल्ह्यातील धरणांमध्ये अजूनही साठा झालेला नाही.
- रब्बी हंगामही कसा असणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
हेही वाचा :
- MSP Rate | दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट! गव्हासह ‘या’ पिकांच्या एमएसपीमध्ये करणार वाढ
- Milk Rate | शेतकऱ्यांना फटका! राज्यातील खासगी-सहकारी दूध संघांकडून गाईच्या दूध दरात ‘इतक्या’ रुपयांची कपात
Web Title: The return of rain to the state begins! Monsoon will be bye-bye from ‘this’ date; Know the current rainfall status