हवामान

Weather Update | मॉन्सूननं आणखी काही भागातून घेतली माघार; राज्यात आज ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता

Monsoon withdrew from some other areas; There is a possibility of heavy rain in these districts in the state today

Weather Update | मॉन्सूननं परतीच्या प्रवासाला सुरुवात केली असून, शनिवारी राजस्थानच्या आणखी काही भागासह पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तरप्रदेशच्या काही भागातूनही तो माघार घेतला आहे. महाराष्ट्रातही मॉन्सूनचा जोर कमी होत आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला आहे. आज कोंकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरात काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

आज पावसाची हजेरी
आज सकाळी राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. आज मराठवाड्यातील परभणी,बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वीजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय.

वाचा : Weather Forecast | हवामान विभागाकडून पावसाबाबत मोठी अपडेट! आज ‘या’ ठिकाणी जोरदार बरसणार पावसाच्या सरी

पावसाचा यलो अलर्ट
तसेच मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यासह सातारा, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. रविवारी विदर्भ, मराठवाडा, कोकणातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सोमवारपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सून माघार घेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता
मॉन्सून माघार घेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. खरीप हंगामात चांगला पाऊस पडला नाही तर पिकांना फटका बसू शकतो. शेतकऱ्यांनी आधीच पाऊस पडल्याची आशा करून पेरणी केली होती. मात्र, आता पावसाचा जोर कमी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हवामान विभागाचे आवाहन
हवामान विभागाने नागरिकांना पावसाचा इशारा लक्षात घेऊन खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पावसात घराबाहेर पडताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच, नदी, नाले, ओढ्यांकाठी जाणे टाळावे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Monsoon withdrew from some other areas; There is a possibility of heavy rain in these districts in the state today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button