ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather News | पुढचे पाच दिवस कसे असेल हवामान? राज्यात पडेल का पाऊस? शेतकऱ्यांनो जाणून घ्या कुठे पडतोय पाऊस…

Weather News | भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस महाराष्ट्रात कोणताही पाऊस (Weather News ) पडणार नाही. राज्यात सध्या थंडी वाढत आहे. सकाळी हवेत गारवा जाणवत आहे. तर दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. राज्यात सध्या सकाळी हवेत गारवा जाणवत आहे. अनेक भागात थंडी वाढल्याचे दिसते. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण (Weather Update) होते. पण आज पावसाची नोंद नव्हती. राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज नसल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले.

कुठे पडतोय पाऊस?
दरम्यान, दक्षिण भारतात काही ठिकाणी पावसाच्या सरी पडत आहेत. श्रीलंका आणि शेजारच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीवर आहे. पश्चिमी विक्षोप समुद्रपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच बंगालचा उपसागराकडून दक्षिण भारताकडे जोराचे वारे वाहत आहेत.

वाचा : Ultraviolet F77 | अल्ट्राव्हायोलेट F77 ने 6,727 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद …

कसे असेल हवामान?

या कारणांमुळे पुढील सात दिवस दक्षिण भारतात हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज आहे. तमिळनाडू आणि करेळच्या काही भागात पुढील तीन दिवस पाऊस पडू शकतो. तर कर्नाटकच्या दक्षिण भागात ३ आणि ५ नोव्हेंबरला पावसाची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

हेही वाचा :

Web Title: What will the weather be like for the next five days? Will it rain in the state? Farmers, know where the rain is falling…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button