Weather Forecasts | शेतकऱ्यांनो सावधान! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, लगेच पाहा कुठे?
Weather Forecasts | राज्यात सध्या हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. मोसमी पावसाने माघार घेतली असली तरी, बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यातील अनेक भागात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची (Weather Forecasts) शक्यता आहे. हवामान खात्याने याबाबत इशारा दिला आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्यांत पाऊस पडणार आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या विभागातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Agriculture) आपल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे आणि घाट परिसरातही हवामान अंशतः ढगाळ राहणार असून, काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, दिवसभर उन्हाचा चटका जाणवू शकतो.
वाचा: ब्रेकिंग! फक्त ‘या’च महिलांना मिळणार मोफत 3 गॅस; सरकारचे नवे नियम जारी
शेतकऱ्यांसाठी काय काळजी घ्यावी?
पिकांची तपासणी: शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नियमितपणे तपासणी करावी.
पाणी साठवण: पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था करावी.
पशुंपालनाची काळजी: पशुंना सुरक्षित ठिकाणी बांधावे आणि त्यांना पुरेशी खाद्यपानी उपलब्ध करून द्यावे.
वाऱ्याचा वेग: वाऱ्याचा वेग जास्त असल्यास झाडे उन्मूळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे झाडांना आधार द्यावा.
हेही वाचा:
• शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या खात्यावर ९६ कोटींचे अर्थसहाय्य जमा