आजचा हवामानाचा अंदाज : पश्चिम महाराष्ट्रासह कोकण रेड अलर्ट जारी वाचा तुमच्या जिल्ह्यातील पावसाचा अंदाज ?
Today's Weather Forecast: Konkan Red Alert Issued in Western Maharashtra Read Rain Forecast in Your District?
महाराष्ट्रमध्ये (In Maharashtra) पाऊस आज पुन्हा दमदार हजेरी लावण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवसाचे हवामान अंदाज वर्तविला आहे. भारतीय हवामान अंदाजानुसार (Indian weather forecast) 17 जुलैपर्यंत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र या भागात मुसळधार ते आते मुसळधार पावसाचा इशारा सांगण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, वाशीम, वसई विरार मध्ये पावसाने आज जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात अतिवृष्टी झाली असून 104 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी, गुहागर, संगमेश्वर या चार तालुक्यात शंभर मिलिमीटर होऊन अधिक पावसाची नोंद झाली आहे.
वाचा: ‘पंतप्रधान पीक विमा’ योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी उरला, फक्त 1 दिवस…
वाशिम जिल्ह्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त (Farmers nervous) झाले असून शेतात पाणी साचल्याने शेतामध्ये अतोनात नुकसान झाले आहे.
भारतीय हवामान अंदाजानुसार 17 जुलैपर्यंत मुसळधार ते मुसळधार पाऊस (Heavy rain)पडण्याचा इशारा दिला आहे तर काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
वाचा: सोयाबीनवरील खोड माशीचे नियंत्रण कसे करावे?
रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, पुणे, या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर (Red alert issued) झाला,असून सिंधुदुर्ग, ठाणे पालघर, मुंबई, धुळ्याला ऑरेंज अलर्ट जारी (Orange alert issued) केला आहे. जालना, औरंगाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती,वर्धा, चंद्रपूर येथे जाहीर करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद सांगली, लातूर, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात हलका पाऊस वर्तवला गेला आहे.
हेहि वाचा: