ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Forecast | आता आणखी भरणार थंडीमुळे हुडहुडी! पण पाऊसही असेल काय? शेतकऱ्यांनो जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Now it will be more cold because of the hood! But will it rain? Farmers, know the weather forecast

Weather Forecast | महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागली आहे. राज्याच्या अनेक भागात कमाल आणि किमान तापमानात घट होऊ लागली आहे. शुक्रवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील नीचांकी १०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मॉन्सूनचा(Weather Forecast) परतीचा प्रवास सुरू झाल्याने ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात उन्हाचा चटका वाढला होता. राज्यात कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पार पोहोचला होता.

त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा कमी होऊ लागला आहे. कोकण वगळता अनेक ठिकाणी दिवसाचे तापमान ३३ अंशांच्या खाली आले आहे. गुरुवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेतकरी मित्रांनो सध्या पावसाची कोणतीही शक्यता नाही.

राज्यात थंडीची चाहूल
किमान तापमानाचा पारा कमी झाल्याने राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगावसह निफाड येथे तापमानाचा पारा १३ अंशांच्या खाली घसरला आहे. पहाटे गारठा जाणवू लागला असून, काही भागात धुक्याची दुलई पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे.

वाचा : Kartiki Ekadashi | कार्तिकी एकादशीची पूजा कोणाच्या हस्ते होणार ; जाणून घ्या लगेच सविस्तर

कमाल आणि किमान तापमान
पुणे ३२.६ (१४.४), जळगाव ३४.८ (१०.९), कोल्हापूर ३२.१ (१९.१), महाबळेश्‍वर २५.८ (१५.६), नाशिक ३२.३ (१५), निफाड ३२.८ (१२.८), सांगली ३३.४ (१८.१), सातारा ३२.५ (१५.७), सोलापूर ३५.८ (१६.५), सांताक्रूझ ३६.१ (२१.४), डहाणू ३५.४ (२१.५), रत्नागिरी ३६.४ (२१.८)

छत्रपती संभाजीनगर ३२.८ (१४.४), नांदेड ३२.४ (१८.२), परभणी ३३.४ (१६.५), अकोला ३५.१ (१७), अमरावती ३३.८ (१६), बुलडाणा ३२.५ (१७.८), ब्रह्मपुरी ३४.४ (१७.५), चंद्रपूर ३१.६(१६.४), गडचिरोली ३२.२ (१६.६), गोंदिया ३१.८ (१४.४), नागपूर ३३.० (१६.६), वर्धा ३३.५(१७.२), वाशीम ३४.६ (१५) यवतमाळ ३४.५ (१६.७).

हेही वाचा :

Web Title: Now it will be more cold because of the hood! But will it rain? Farmers, know the weather forecast

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button