बाजार भाव

Market Prices | अर्र अर्र..! कापसाचे वायदे नरमले अन् उडदाचे दर वाढले; जाणून घ्या कापूस, सोयाबिन, तूर, उडीद आणि हळदीचे ताजे भाव

Market Prices | सोयाबीन:

  • आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे (Market Prices) वाढून १२.५० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते.
  • देशातील बाजारात सोयाबीनला आजही ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला.
  • ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज आहे.

कापूस:

  • आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही कापसाच्या वायद्यांमध्ये लक्षणीय घट झाली.
  • देशातील बाजारात कापूसला आज सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला.
  • कापूस बाजारातील चढ उतार दोन ते तीन आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज आहे.

तुरी:

  • तुरीला उठाव मिळत असल्याने भावाला आधार आहे.
  • देशभरातील बाजारात तुरीला सरासरी १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
  • तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

वाचा:Bus|लालपरीची ऑनलाईन प्रणाली झाली लोकप्रिय! पाच महिन्यांत १३ लाख तिकिटांची विक्री

हळद:

  • हळद बाजारातील तेजी हंगामाच्या आधीपासूनच आहे.
  • सध्या हळदीला सरासरी १४ हजार ते १८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
  • यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील.
  • त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

उडीद:

  • उडदाची बाजाराील आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे मागणी चांगली आहे.
  • सध्या उडदाचा भाव ९ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे.
  • उडदाच्या भावातील ही तेजी कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button