बाजार भाव

Market price | गव्हाचे दर तेजीत! तर कापसाचे दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ; जाणून घ्या सोयाबिन, उडीद आणि हरभऱ्याचे ताजे बाजार भाव

Market price | आजच्या बाजारपेठेतील काही प्रमुख वस्तूंच्या भावांमध्ये (Market price) बदल झाले आहेत.
कापूस:

  • आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ७९ सेंट प्रतिपाऊंडवर होते.
  • देशातील बाजारात कापसाचे भाव २०० रुपयांनी वाढले होते.
  • बाजार समित्यांमधील आवक ४२ हजार गाठींवर होती.
  • बाजारभाव ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते.
  • बाजारात चढ उतार राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीन:

  • आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे १२.४५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते.
  • सोयातेल ४५.८२ सेंट प्रतिपाऊंडवर होते.
  • सोयापेंडचा भाव ३७८ डाॅलर प्रतिटनांवर होते.
  • देशातील बाजारात रोज ५० रुपयांपर्यंतचे चढ उतार दिसत आहेत.
  • सरासरी दरपातळी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत.
  • सोयाबीनच्या भावातील चढ उतार आणखी काही दिवस दिसू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

वाचा | Irrigation Loans | मोठी बातमी ! राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी नाबार्डकडून १५ हजार कोटींचे कर्ज!

टोमॅटो:

  • टोमॅटोचा बाजार मागील काही आठवड्यांपासून दबावात आहे.
  • बाजारात आवक वाढत असल्याचा दबाव दरावर दिसून येत आहे.
  • काही बाजारांमध्ये टोमॅटोचा भाव अगदी ५०० रुपये प्रतिक्विंटलपासून सुरु होत आहे.
  • देशातील बाजारांमध्ये सरासरी दरपातळी ९०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत.
  • टोमॅटो बाजारातील ही स्थिती पुढील काही आठवडे दिसू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

उडीद:

  • देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून उडदाचे भाव टिकून आहेत.
  • बाजारातील आवक खूपच कमी आहे.
  • सरकारने उडदाचे भाव कमी कऱण्यासाठी अनेक निर्णय घेतले.
  • तरीही सरकारला अपेक्षेप्रमाणे भाव पाडता आले नाहीत.
  • सध्या उडदाचा भाव ९ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे.
  • उडदाच्या भावातील ही तेजी कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

इतर वस्तू:

  • देशातील गव्हाचे उत्पादन यंदाही सलग दुसऱ्यावर्षी कमी झाले.
  • बाजारातील भाव हमीभावापेक्षा जास्त आहेत.
  • गव्हाचे भाव २ हजार ४०० ते २ हजार ८०० रुपयांचा भाव मिळत आहे.
  • गव्हाचे भाव यापुढील काळातही कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.

कृषी बातम्या, शेतमाल बाजारभाव, Agriculture News, Farm Commodity Market Prices,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button