हवामान

Mansoon Update | हवामानाबाबत मोठी अपडेट! राज्यात उन्हाचा चटका; शेतकऱ्यांनो जाणून घ्या आता पाऊस पडणार का?

Big weather update! Heatstroke in the state; Farmers know, will it rain now?

Mansoon Update | महाराष्ट्रात आजपासून ऑक्टोबर हिटचा चटका जाणवू लागला आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या मते, राज्यातील ढगाळ वातावरण (Mansoon Update) निवळून ऑक्टोबर हिटचा परिणाम पूर्ववत जाणवणार आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षीची ऑक्टोबर हिट महाराष्ट्रात अधिक दाहक जाणवण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

तापमान वाढणार
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा दुपारचे कमाल तापमान 2 डिग्रीने तर पहाटेचे किमान तापमान 3 ते 4 डिग्रीने अधिक असण्याची शक्यता आहे. कोकण आणि मराठवाड्यात ऑक्टोबर हिटचा परिणाम अधिक असण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.

अरबी समुद्रात केरळ राज्यातील कोचीन-अल्लेप्पी अक्षवृत्तच्या दरम्यान पण लक्षद्विप बेटांच्याही अति पश्चिमेकडे आज तयार झालेले कमी दाब क्षेत्र एका आठवड्यात म्हणजे 26 ऑक्टोबर नंतर पुढील पायऱ्यांमध्ये विकसित होणार आहे. कमी दाबाचे क्षेत्र ओमानच्या दिशेने निघून जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर पावसासाठी त्याचा कोणताही परिणाम होण्याची शक्यता नसल्याची माहिती खुळे यांनी दिली आहे.

वाचा : Mansoon | अर्रर्र…! येत्या 24 तासात चक्रीवादळ धडकण्याची शक्यता; थेट मान्सून 10 दिवस लांबणार, चक्रीवादळाचा होणार जबरदस्त परिणाम

बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या कोलोम्बो शहराच्या अक्षवृत्तावर पश्चिमेकडे दक्षिण ब्रम्हदेशाच्या पश्चिम किनारपट्टीवर आज तयार झालेली चक्रीय वाऱ्याची स्थितीचे रुपांतर 21 ऑक्टोबरला कमी दाब क्षेत्रात रूपांतर होणार आहे. त्यानंतर पुढील पायऱ्यांमध्ये विकसित होवून दक्षिण बांगलादेशच्या दिशेनं निघून जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर पावसासाठी कोणताही परिणाम होण्याची शक्यता नसल्याची माहिती खुळे यांनी दिलीय. माणिकराव खुळे यांनी ऑक्टोबर 25 पर्यंत महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा परिणाम कायम असण्याची शक्यता वर्तवली आहे.

केरळमध्ये मुसळधार पाऊस
दरम्यान, केरळमध्ये गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात पाणी साचलं होतं. तिरुअनंतपुरममध्येही पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातील अनेक भागात पाणी साचल्याने संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत नागरिकांनी योग्य ती खबदारी बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा :

Web Title: Big weather update! Heatstroke in the state; Farmers know, will it rain now?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button