राशिभविष्य

Horoscope | 2025 पर्यंत कल्पनेपेक्षाही जास्त श्रीमंत होणार ‘या’ राशीच्या व्यक्ती; राहुच्या राशी बदलामुळे तीन राशींचे नशीब पालटणार

Horoscope | ज्योतिष शास्त्रानुसार, राहु ग्रह हा एक छाया ग्रह आहे आणि त्याचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर खूप तीव्र असतो. राहुने गेल्या वर्षी 30 ऑक्टोबर 2023 रोजी मंगळाची राशी (Horoscope) मेष सोडून गुरूच्या मीन राशीत प्रवेश केला आहे. राहु मीन राशीत 18 मे 2025 पर्यंत राहील. यानंतर राहु शनिदेवाची राशी कुंभ राशीत गोचर करेल. राहु जेव्हाही राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव प्रत्येक राशीवर वेगवेगळ्या प्रकारे जाणवतो.

अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्कि राम यांच्या मते, राहुच्या राशी बदलामुळे 2025 पर्यंत वृश्चिक, मिथुन आणि वृषभ या तीन राशींचे नशीब पालटणार आहे. या राशींना राहुची विशेष कृपा मिळेल आणि त्यांना अनेक क्षेत्रात यश मिळेल.

हेही वाचा:Bank Account | सावधान! ‘या’ बँकेत तुमचं खातं तर नाही ना? महिन्याभरातच होणार बँक खाती होणार बंद, अन्यथा पैसे बुडतील

वृश्चिक राशी:

 • या राशीच्या लोकांसाठी हा कालावधी खूप चांगला असणार आहे.
 • त्यांना नशिबाची साथ मिळेल आणि आर्थिक फायद्याचाही योग आहे.
 • उत्पन्नात वाढ होईल आणि काही वर्षांपूर्वी दिलेले पैसे परत मिळतील.
 • कुटुंबात सामंजस्य राहील.

मिथुन राशी:

 • मिथुन राशीच्या जातकांसाठी राहुचे मीन राशीत असणे हे खूप फायदेशीर ठरेल.
 • व्यापारात वाढ होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल.
 • नोकरीमध्ये वरिष्ठांची साथ मिळेल आणि दाम्पत्य जीवनात मधुरता येईल.
 • परदेशात ट्रिपसाठी जाण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी:

 • या राशीच्या लोकांना खूप मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
 • प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि समाजात मान वाढेल.
 • अडकलेले पैसे परत मिळतील आणि धार्मिक कार्यात रुची वाढेल.
 • परदेश यात्रेचा योग तयार होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button