बाजार भाव

Cotton Soybean Rate | दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या कापूस-सोयाबीनला कसा मिळतोय दर? जाणून घ्या सर्वाधिक मिळालेला दर…

How is the price of farmers' cotton-soybeans getting at the time of Diwali? Find out the highest rate…

Cotton Soybean Rate | दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आपला शेतमाल बाजारात आणत आहेत. खरीपाच्या पिकाची, अवर्षण, दुष्काळाची स्थिती पाहिली तर शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळताना दिसत आहे. तर ग्राहकांच्या हिताचा विचार करून सरकार शेतमालाचे भाव दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक शेतकरी बाजारात शेतमाल आणत असतात. त्या पार्श्वभूमीवर अनेकदा दरही चांगला मिळतो. मात्र, यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावरही शेतमालाच्या दरात कोणतीच वाढ झाली नाही.

आजचे कापसाचे दर
आज, दिवाळीच्या आधीच्या दिवशी, बाजार समितीत आलेल्या कापसाचा भाव स्थिर असल्याचं चित्र होतं. ६ हजार ५० रूपये प्रतिक्विंटल ते ७ हजार २२० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर कापसाला मिळाला. त्यामध्ये मध्यम धाग्याच्या कापसाला कमी तर लांब धाग्याच्या कापसाला जास्त दर मिळताना दिसत आहे. अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कापूस खरेदी करत असल्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्च वाचतो पण व्यापारी शेतकऱ्यांना दर कमी देताना दिसत आहेत.

वाचा : School Nutrition | सरकारने शालेय पोषण आहारात अंडी आणि केळीचा समावेश केला, आता शेतकऱ्यांपासून थेट खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा!

आजचे सोयाबीनचे दर
सोयाबीनच्या बाबतीतही दर स्थिर राहिले. आज तासगाव बाजार समितीत सोयाबीनला सर्वांत जास्त ५ हजार ६० रूपये सरासरी दर मिळाला आहे. तर मेहकर बाजार समितीत सर्वांत जास्त म्हणजे ५ हजार ४०० रूपये कमाल दर मिळाला. तर लासलगाव-विंचूर, लासलगाव, हिंगणघाट, वरोरा-खांबाडा, वरोरा या बाजार समितीत किमान दर सर्वांत कमी म्हणजे ३ हजार इतका मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने शेतमालाचे भाव वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन खर्च तरी मिळेल.

हेही वाचा :

Web Title: How is the price of farmers’ cotton-soybeans getting at the time of Diwali? Find out the highest rate…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button