ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Cabinet Decisions | मंत्रिमंडळ बैठकीत दिवाळीच्या मुहूर्तावर सामान्यांना ‘गिफ्ट’! आनंदाचा शिधामध्ये ‘या’ वस्तूंचा समावेश अन् बरचं काही

'Gift' to common people on the occasion of Diwali from Shinde government! The inclusion of 'these' items in the ration of happiness

Cabinet Decisions | महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक निर्णय घेण्यात आले. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा १०० रुपयात आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. आनंदाचा शिधामध्ये आता मैदा आणि पोहेचा देखील समावेश करण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ निर्णय
मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. यामध्ये मैदा आणि पोहे हे दोन पदार्थ वाढवले आहे. अल्पसंख्याक २७ विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबिनवर जो रोग आला आहे, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या इतर महत्त्वाच्या निर्णयांमध्ये विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

वाचा : Maharashtra Cabinet Decision | शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदान ते पिक विम्यापर्यंत वाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय

नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ४५ पदांनाही मंजुरी देण्यात आली आहे. इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार असून विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे.

आनंदाचा शिधामध्ये मैदा आणि पोहेचा समावेश करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दिवाळीच्या तोंडावर हा निर्णय सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा ठरेल.

हेही वाचा :

Web Title: ‘Gift’ to common people on the occasion of Diwali from Shinde government! The inclusion of ‘these’ items in the ration of happiness

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button