ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना
ट्रेंडिंग

शेतकरी कंपन्यांसाठी 200 क्रॉपशॉपची उभारणी करणार -सहकारी महामंडळाचा निर्णय

To set up 200 cropshops for farming companies - Co-operative Corporation decision

केंद्र सरकारने (Central Government) नुकतेच शेती उत्पादक कंपन्यांना (To agricultural manufacturing companies) प्रोत्साहन देणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी दिली, 2026 पर्यंत देशामध्ये शेती उत्पादक कंपन्यांची संख्या दहा हजारापर्यंत पोहोचण्याची सरकारचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्र राज्यातील सहकार विकास मंडळाने (Co-operative Development Board) शेतकरी उत्पादक कंपन्यांना बळकटी मिळण्यासाठी 200 क्रोपशॉप (Cropshop) उभारणार संकल्प हाती घेतला आहे. क्रोपशॉप मध्ये सहभागी झालेल्या कंपन्यांना ब्रॅण्ड, मार्केटिंग, पॅकेजिंग,बिलिंग सॉफ्टवेअर, या सर्व सुविधा मोफत मिळणार आहे.

या उपक्रमात सहभाग नोंदवून याकरिता तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी बाजारपेठेच्या ठिकाणी 200 चौरस मीटरची जागा असणे अनिवार्य आहे याकरता सर्वसाधारणपणे एक लाख रुपये पर्यंतचे गुंतवणूक करावी लागणार आहे व शेतकरी कंपन्यांना यामागे 20 ते 30 टक्के नफा मिळू शकतो अशी माहिती सायली परब यांनी दिली.

ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल मिळवून देणे तसेच शेतकरी कंपन्यांना 20 ते 30 टक्के पर्यंत नफा करून देणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. या उपक्रमात सहभाग नोंदवणे करिता अधिक माहिती मिळवण्याकरिता 020 29809408 या क्रमांकावर संपर्क साधावा येथे तुम्हाला सर्व माहिती मिळू शकेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button