महाराष्ट्राध्ये साधारणतः दुय्यम क्षेत्रावर नगदी व महत्वाचे पीक म्हणजे कापूस होय,कापूस पिकाची महाराष्ट्रमध्ये लागवड करण्यात येते. राज्यातील प्रामुख्याने विदर्भ व मराठवाडा विभागात कापूस हे महत्वाचे नगदी पीक आहे. कपाशीवर बोंडअळया, तुडतुडे, मावा इ. किडींचा प्रादुर्भाव आढळून येत असतो
हे ही वाचा : केळी व खरबूज रोपांमध्ये शेतकऱ्यांची मोठी फसवणूक! लाखो रुपयाचे नुकसान, वाचा सविस्तर बातमी..
फेरोमोन सापळ्याचा वापर करावा यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळ्यामध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावे. फुलावस्थेत दर आठवड्याने पिकामध्ये मजुरांच्या सहायाने डोमकळ्या (गुलाबी बोंडअळी ग्रस्त फुले) शोधून नष्ट कराव्या. 5 टक्के निंबोळी अर्क किंवा अॅझॉडिरेक्टीन 0.03 (300 पी.पी.एम) 50 मी.ली. किंवा 0.15 टक्के (1500 पी.पी.एम.) 25 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
प्रत्येक आठवडयाला एकरी शेतीचे प्रतिनीधीत्व करतील अशी 20 झाडे निवडून निवड केलेल्या प्रत्येक झाडावरील मध्यम पक्व झालेल्या बाहेरुन किडके नसलेले एक बोंड असे 20 बोंडे तोडून ते भुईमुगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचवून त्यामधील किडके बोंड व अळ्याची संख्या मोजून ती दोन किडकी बोंड किंवा दोन पांढुरक्या / गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळ्या आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी (5 ते 10 टक्के) समजून खालीलप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.
हे ही वाचा : दूधव्यवसाय संकटात! शेतकऱ्यांकडून अवघ्या, ‘इतके’ रुपयात दूध खरेदी…
थायोडीकार्ब 75 टक्के, डब्ल्युपी 25 ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के, एएफ 25 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 25 टक्के, प्रवाही 25 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के, 30 मि.ली. किंवा इंडोक्साकार्ब 15.8 टक्के, 10 मि.ली. किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के, 10 मि.ली. या पैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जेथे प्रादुर्भाव 10 टक्केच्यावर आहे अशा ठिकाणी आवशकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून खालील पैकी कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामध्ये ट्रायझोफॉस 35 टके + डेल्टामेथ्रीन 1 टक्के, 17 मि.ली. किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल 9.3 टक्के + लॅब्डासायहॅलोथ्रीन 4.6 टक्के 5 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के, 20 मि.ली. किंवा इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के + ॲसीटामाप्रिड 7.7 टक्के 10 मि.ली. किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हे ही वाचा :
1)थोडासा दिलासा! कृषी निगडीत दुकाने ‘या’ वेळेत सुरु राहणार…
2)सल्ला तज्ञांचा: जाणून घ्या, जनावरांच्या आहारामध्ये कोणत्या घटकांचा समावेश असावा…