कोवीड - १९

“या” नव्या कोरोना व्हेरिएंट पासून संपूर्ण जगाला धोका; पहा सध्या कोण कोणत्या देशात आहे?

Threat to the whole world from the "new" Corona variant; See who is currently in which country?

सध्या जगाला कोरोनाचा धोका असताना कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. कोरोनाचा हा व्हेरिएंट (Corona variant) नियंत्रणाच्या बाहेर असल्याचे सांगितले जाते. या सोबत लसीपासून मिळाणाऱ्या सुरक्षेला देखील हा व्हेरिएंट (variant) मात देऊ शकतो असे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. त्याचा प्रसार कधी होईल सांगता येणार नाही त्यामुळे आधीच सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचं हे नवं रूप दक्षिण अफ्रिकामध्ये (South Africa) आणि इतर काही देशांमध्ये सापडले आहे.

प्रत्येक महिन्यात व्हेरिएंटची संख्या वाढतेय-

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार C.1.2 अधिक संसर्गजन्य असू शकतो. तसेच लसीद्वारे मिळणाऱ्या संरक्षणाला मात देऊ शकतात. एका अभ्यासात दक्षिण आफ्रिकेतील(South Africa) C.1.2 चा जीनोम दर महिन्याला वाढतो असल्याचे सांगितले आहे. मे मध्ये 0.2 टक्क्यांवरून जूनमध्ये 1.6 टक्के आणि जुलैमध्ये दोन टक्क्यांपर्यंत वाढले.

वाचा: रुफटॉप सौर योजना यंत्रणेवर 40 टक्के अनुदान; वीज ग्राहकांना कसा घेता येईल लाभ? वाचा सविस्तर

वाचा: पुढचे 5 दिवस “या” पिकांची अशी घ्या काळजी; अन्यथा नुकसानास बळी पडाल..

कोरूनाचा नवे रूप –

दक्षिण आफ्रिकेत असलेल्या नॅशनल इंस्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिजीज अँड क्वाजुलु नॅटल रिसर्च इनोवेशन अँड सिक्वेंसिंग प्लेटफॉर्मच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट C.1.2 सर्वात पहिल्यांदा मे महिन्यात सापडला.

कोरोना व्हेरिएंट चा या ठिकाणी प्रसार-

13 ऑगस्टपर्यंत हा व्हेरिएंट चीन, कांगो, मॉरीशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल और स्वित्झलंडमध्ये हा व्हेरिएंट सापडला आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण आफ्रिकेत कोविड 19 च्या पहिल्या लाटेदरम्यान समोर आलेल्या व्हायरसच्या Subtypes पैकी एक C.1च्या तुलनेत C.1.2 जास्त म्युटेट झाला. ज्याला ‘Nature of Interest’च्या श्रेणीत वर्गीकृत करण्यात आले आहे.

व्हेरिएंटची गती-

सीएसआयआर, कोलकाताचे वैज्ञानिक यांच्या म्हणण्यानुसार या व्हेरिएंट चा प्रसार जास्त व वेगाने पसरण्याची शक्यता आहे. वाढलेले प्रोटीनमध्ये अनेक म्यूटेशन असतात. ज्यामुळे हा रोग प्रतिकारशक्तीच्या नियंत्रणात राहत नाही. तो पसरला तर यापेक्षा भयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button