महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्याचे 85000 अवजारांचा “अवजार घोटाळा”; शेतकऱ्यांसाठी खरेदी केलेल्या अवजारांचे वाटपच नाही…
Thousands of farmers' tools missing? See where the tools went in detail.
सरकारने अनेक प्रयत्न करून देखील भ्रष्टाचाराला आळा बसला नाही. त्यामधला एक प्रकार म्हणजे अवजार घोटाळा! शेतकऱ्यांची हजारो अवजारे गायब झाली आहेत. कधी पैशामधील घोटाळा तर कधी जमिनीतील घोटाळा असे घोटाळे आपण ऐकतच आलो आहोत. परंतु राज्य सरकारने विकत घेतलेले 85000 अवजारे शेतकऱ्यांना वाटले गेले नाहीत. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकार असो वा राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत असते. राज्यातील अल्पभूधारक, मागास वर्गीय, तसेच विविध गटातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने अवजारे मंजूर केली होती. ही अवजारे कृषी विभागाकडे देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात ही अवजारे शेतकऱ्यांकडे पोचली का? तर नाही. आणि उघड झाला अवजार घोटाळा! हा अवजार घोटाळा सर्वात जास्त चंद्रपूर जिल्ह्यात झालेला दिसतो. या जिल्ह्यामध्ये 12000 पेक्षा जास्त ही अवजारे गायब झाली आहेत. तसेच नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार गडचिरोली, यवतमाळ, रत्नागिरी, अकोला जिल्ह्यातील शेतकरी देखील या अवजारांचा पासून वंचित आहे, ही अवजारे कृषी उद्योग विकास मंडळाच्या ठेकेदारांकडून संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. मात्र टक्केवारी वरून गोंधळ झाल्याने अवजारे बोगस असल्याचे सांगून शेतकऱ्यांना त्याचे वाटप केले नाही.
शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने खरेदी केलेल्या अवजारांचे वाटप का झाले नाही. याची चौकशी राज्यभर सुरू आहे. परंतु यामध्ये कृषी उद्योग महामंडळ कृषी विभाग यंत्रणा त्यामध्ये ताळमेळ नाही.