कृषी बातम्या

Tur Rate | तूर उत्पादकांची चांदी! आयात वाढूनही यंदा बाजारात तूर राहणार तेजीत, जाणून घ्या कसा मिळेल भाव?

Tur Rate | भारतात तुरीच्या डाळीला सामान्य वर्गाकडून प्रचंड मागणी मिळते. कारणं सामान्य नागरिकांचं दररोज जेवण हे वरण भातानेच पुर्ण होते. याचमुळे भारतात तुरीची लागवड (Tur Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच मागणी पूर्ण करण्यासाठी तुरीची इतर देशातून आयात देखील केली जाते. त्याचवेळी शेतकऱ्यांना (Agriculture) यंदा तुरीला चांगला दर मिळणार आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Financial) दिलासा मिळणारं आहे. चला तर मग जाणून घेऊयात तुरीचे दर यंदा का वाढू शकतात.

वाचा: ब्रेकींग! मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतले एकापेक्षा एक धडाकेबाज निर्णय; थेट शेतकऱ्यांचं बदलणार नशीब

यंदा तूर उत्पादनात होणारं घट
खर तर, यंदाच्या वर्षी तुरीच्या पिकाला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाचा मोठा बसत आहे. याच कारणामुळे तुरीची लागवड (Department of Agriculture) होऊन देखील उत्पादनात घट होऊ शकते. जवळपास यंदा तूर उत्पादनात 20 टक्के इतकी घट होऊ शकते. ज्याचा परिणाम दरावर होऊ शकतो.

ब्रेकिंग न्यूज! केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार 10 हजार रुपये; त्वरित जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?

आयात वाढूनही तुरीला मिळणार चांगला दर
देशातील उद्योग यावर्षी 27 ते 32 लाख टन तुरीचा अंदाज व्यक्त करत आहे. तर देशात यावर्षी 8 लाख टन होऊ शकते. म्हणजेच देशात एकूण 35 ते 40 टन लाख तुरीचा (Type of Farming) पुरवठा होऊ शकतो. परंतु देशात तुरीची गरज 44 लाख टन इतकी आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार शेततळे; अनुदानातही झाली ‘इतकी’ वाढ

मात्र, देशात यंदा मोठ्या प्रमाणात तुरीची आयात केली जाणार आहे. सध्या तुरीच्या आयातीची जोरदार हालचाल सुरू आहे. तर, आफ्रिकेतून तुरीची आयात केली जाणार आहे. तर तुरीचे नवे पीक फ्रेब्रुवरीपासून हाती येणार आहे. त्यामुळे एप्रिलपर्यंत बाजारात तुरीची मोठी आवक होईल.
परंतु तुरीची मागणी पाहता तुरीची आवक मोठी असून देखील दर मात्र तेजीतच राहू शकतात. याच कारणामुळे यंदा तुरीला चांगला दर मिळू शकतो. यामुळे तूर उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जर सरकारने महागाई कमी करण्यासाठी दर नियंत्रणात ठेवले नाही, तर तुरीचे दर नक्कीच हमीभावापेक्षा जास्त राहू शकतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button