“या” तिखट मिरचीचे 3 तुकडे खाल्ले तर जागतिक विक्रम आणि 4 तुकडे खाल्ले तर गिनीज वर्ल्डमध्येच रेकॅार्ड; पहा काय आहे मिरचीचे वैशिष्ट्ये..
मिरचीचे तीन तुकडे जरी खाल्ले तरी जागतिक विक्रम होणार आहे आणि एक जास्त तुकडा खाल्ला तर थेट गिनीज वर्ल्डमध्येच रेकॅार्ड. या लवंगी मिरचीचे नाव आहे ‘कॅरोलिना रीपर’ ही अमेरिकेत पिकवली जाते. जाणून घेऊ या अगळ्यावेगळ्या मिरचीबद्दल…
वाचा –
हिरवी गावरान मिरची खाल्ली तर अंगाचा लाहीलाही होते. पण जगात मिरचीचा असा एक प्रकार आहे तो पाहून तुम्ही हैराण होताल. या लवंगी मिरचीचे नाव आहे ‘कॅरोलिना रीपर’ ही अमेरिकेत पिकवली जाते. जाणून घेऊ या अगळ्यावेगळ्या मिरचीबद्दल….
‘कॅरोलिना रीपर’ मिरचीचे वेगळेपण –
‘कॅरोलिना रीपर’ ही मिरची एवढी तिखट आहे की जागतिक स्तरावर हीची नोंद घेण्यात आली आहे. ही मिरची आपल्या सिमला मिरचीसारखी दिसते. या मिरचीचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ‘जगातील मसालेदार मिरची’ म्हणून नोंदवले गेले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, कॅरोलिना रीपर सारख्या जगात इतक्या मसालेदार मिरच्या कधीच घडल्या नाहीत.
वाचा –
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ‘जगातील मसालेदार मिरची’ म्हणून नाव नोंदवले गेले
एका माणसाने 10 सेकंदांपेक्षाही कमी वेळात या तीन मिरच्या खाल्ल्या होत्या. त्यानंतर त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले होते. यापूर्वी कोणीही ही मिरची इतक्या वेगाने खाल्ली नव्हती. कारण त्यातील फक्त एक छोटासा तुकडाच लोकांची स्थिती बिघडवू शकतो. मिरचीचा एसयू (हीट्स युनिट) 5000 च्या जवळपास असतो. अशी मिरचीचे सेवण करणेही मुश्किल असते. तर या मिरचीचे एसयू तपासणी ही 2012 मध्ये दक्षिण कॅरोलिना येथील विंथलॉप विद्यापीठाने केली होती, ज्यात 15,69,300 एसएचयू किंवा स्कोवेल हीट युनिट्स सापडले. जे इतर मिरचीच्या तुलनेत 440 पटीने मसालेदार अधिक आहे. त्यामुळे हे क्वचित लोक सेवण करु शकतात. या मिरचीचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ‘जगातील मसालेदार मिरची’ म्हणून नोंदवले गेले आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा