ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

कपाशीची ही नवीन जात पाण्याऐवजी करणार तेलाचे शोषण; कृषी संशोधकांना मिळाले यश…

कृषी संशोधक (Agricultural researcher) काहीना काही कृषी (Agricultural) निगडित संशोधन करत असतातच. नवनवीन तंत्रज्ञाचा शोध करण्यात आलेले आपण पाहिले आहे. आज कपाशीच्या पिकाच्या ऐका नविन जातींबद्दल आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक नवीन शोध कृषी संशोधकांनी (Agricultural researcher) लावला आहे. कापसाची एक नवीन जात शोधण्यात कृषी संशोधकांना (Agricultural researcher) यश आले आहे. संशोधकांनी शोधलेली ही कपाशीची जात पाण्याचे नव्हे तर चक्क तेलाचे शोषण करणार आहे. ते कसे? याविषयी सविस्तर माहिती घेऊया…

वाचा

मोठी बातमी; राज्यातील अतिवृष्टी शेतकऱ्यांना 122 कोटींचा निधी मंजूर, 4 दिवसात मदतीचे वाटप करणार..

कपाशीच्या नवीन जातीचा शोध –

कपाशीच्या (cotton) एका नव्या जातीचा शोध लावण्यात आला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (Indian Institute of Technology) गुहाटी येथील शाखेने हा शोध लावला आहे. या संस्थेतील संशोधकांनी कपाशीच्या एका वेगळ्या प्रकारच्या जातीचा शोध लावला आहे. ज्यामध्ये कपाशी (cotton) ची जात पाण्याचे नव्हे तर चक्क तेलाचे शोषण करणार आहे.

वाचा –

तेलाचे शोषण असे होणार –

समुद्रात किंवा नद्यांमध्ये तेलगळती होत असते. त्यामुळे पाण्यातील माशांचे सारखा जीवजंतूनाघातक ठरते. याचा परिणाम पर्यावरणावर देखील होत असतो. पाण्यातील तेल वेगळे करणे अत्यंत कठीण असते. सहसा तेल काढण्याला काही पर्याय नसतो. पण यावर संशोधकांनी एक कपाशीची नवीन जात शोधली आहे जी पाण्याचे शोषण नाही तर तेलाचे शोषण करेल. त्यामुळे कापसाचा (cotton) वापर करून तेल बाजूला सहज करता येणार आहे.

जलचर जीवांना धोकादायक असलेलेहे तेल सहजपणे बाजूला करता येणे शक्य असल्यामुळे समुद्र जीवांचे होणारे नुकसान टळणार आहे. कारण या कापसाचा वापर करून तेल सहजपणे पाण्यापासून वेगळे करता येणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button