कृषी बातम्या
ट्रेंडिंग

PM किसान सन्मान योजनेची ‘ही’ आहे शेवट ची तारीख; नियमावली मध्ये बदल! कोण होणार, पात्र आणि कोण अपात्र..

शेतकरी बांधवासाठी भारत सरकार काहीं ना काही योजना काढत असते. त्यातील एक योजना म्हणजे, PM शेतकरी सन्मान निधी योजना होय. या योजनेचा उद्देश गरीब शेतकऱ्यांना लाभ मिळावा. तसेच बियाणे, खते खरेदी करण्यासाठी रक्कम दिली जाते. सन्मान निधी योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात.

2000 रुपयांचे तीन टप्यात हे पैसे शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंट वर जमा केले जातात. परंतु या वर्षी या योजनेत बदल करण्यात आला आहे. मोदी सरकारकडून या योजनेचा फायदा कोणाला घेता येणार आणि कोणाला वगळणार, हे स्पष्ट केले आहे. याचा उद्धेश फक्त्त गरीब शेतकरी बांधवाना लाभ मिळणे होय.

कोण होईल पात्र?
ज्यांची स्वतः च्या नावे जमीन आहे असे शेतकरी.

कोण आहेत अपात्र?

• असे शेतकरी कुटुंब ज्यामधील एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती पुढील श्रेणीत येतात- व्यावसायिक डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सीए, आर्किटेक्ट मंडळी

• घटनात्मक पदावरील शेतकरी, आजी आणि माजी मंत्री, लोकसभा आणि राज्यसभा खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष हे सर्व या योजनेच्या बाहेर आहेत.

• केंद्र सरकार/ राज्य सरकार आणि PSUs मध्ये सध्या काम करत असणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ /चतुर्थ वर्गीय आणि ग्रुप डी कर्मचारी सोडून)

• केंद्र आणि राज्य सरकारमधील 10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शेतीला देखील याचा लाभ नाही.

• मागच्या वर्षी आयकर भरणारे शेतकरी योजनेच्या फायदा मिळणार नाही.

• तुम्ही दुसऱ्याची जमिन भाड्याने घेऊन कसत असाल तरी या योजनेचा लाभ मिळणार नाही

• नोंदणी प्रक्रियेत मुद्दाम चूक करणाऱ्यांना देखील फायद्यापासून वंचित राहावं लागेल.

या योजने चा लाभ घेण्यासाठी काय कराल?
या योजनेचा फायदा घेण्यासाठी 31 मार्च आधी नोंदणी करा. 31 मार्च आधी रजिस्ट्रेशन केल्यावर तुमच्या अकाउंट ला पैसे येतील. एप्रिल मे मध्ये 2000 रुपये पहिला हप्ता मिळेल.

Web Title: This is the last date of PM Kisan Sanman Yojana; Changes in the rules! See in detail who will be, eligible and who will be ineligible.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button