आरोग्य

“या” छोट्या फळांमध्ये आहे, मोठे विशेष गुणधर्म पहा किती आरोग्यवर्धक आहे हे फळ…

"This" is in small fruits, big special properties See how healthy this fruit is

लिंबू हे पाचक तसेच नेत्र सतेज करणारे उत्साहवर्धक रुचकर वायूहरक आहे. तसेच अनेक रोगांवर उपाय -कारक म्हणून सुद्धा लिंबाकडे पाहिले जाते, उलटी कंठरोग, कॉलरा ,आमवात ,रक्तवात व कृमींचा नाश करणारे हे लिंबू अत्यंत गुणकारक आहेत.

लिंबाच्या रसामध्ये जंतुनाशक व प्रतिकारक्षमता वाढवण्याची शक्ती असते. उन्हाळ्यामध्ये लिंबाचा आहारामध्ये वापर करणे अत्यंत लाभदायक आहे.

  • लिंबामध्ये विपुल प्रमाणात जीवनसत्व असतात,चला तर पाहुयात लिंबाचे गुणधर्म:*

🍋लिंबामध्ये जीवनसत्त्व असल्यामुळे रक्तपित्त वर नियंत्रण आणते.

🍋लिंबूचा रस दात आणि हाडांची मजबुती तसेच संधिवाताच्या विकारावर अत्यंत गुणकारी आहे.

🍋अपचन हृदयाची धडधड ,उच्च रक्तदाब कमी घेण्याकरता लिंबूचा रस अत्यंत उपायकारक आहे.

🍋मूत्रपिंड मूत्राशय यकृत यांसारख्या विकारांवर देखील लिंबूचा रस फायदेशीर ठरतो.

🍋मध व लिंबाचा रस आणि बद्धकोष्ठता दूर होते तसेच थकवा पण दूर होण्यास मदत होते.

🍋मध लिंबाचा रस आणि पाणी नियमितपणे घेतल्यास आरोग्यासाठी उत्तम उपयुक्त आहे.

🍋लिंबाच्या सालीमध्ये पाच ते दहापट अधिक जीवनसत्वे असतात, त्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि जीवनसत्वे ‘क’ यांचे विपुल प्रमाण असते.

🍋चहामध्ये लिंबाची साल टाकून केल्यास कॅन्सरच्या पेशी जास्त वाढत नाही, असं संशोधनात सिद्ध झाले आहे.

🍋लिंबामध्ये क जीवनसत्त्वे तसेच कॅल्शियम असते त्यामुळे हाडे मजबूत राहतात व हाडांच्या संबंधित आजार होत नाही.

🍋हिरड्यातून रक्त येणे हिरड्या सुजणे असे अनेक दातावरील समस्या उद्भवतात त्याच्यासाठी लिंबू अत्यंत गुणकारी ठरते.

🍋लिंबू साल वजन घटण्यास मदत करते लिंबाच्या सालीमध्ये पेक्तीन हा घटक असतो त्यामुळे शरीरातील वजन कमी होण्यास मदत होते.

🍋लिंबाचा उपयोग करून आपण उद्योग प्रक्रियेत देखील संधी शोधू शकतो. योग्य व्यवस्थापन आणि मार्केटिंग केल्यास लिंबू द्विपाद व्यवसायात प्रगती होऊ शकते.

लिंबा पासून होणारे पदार्थ:

१)लिंबाचा रस लिंबू सिरप
२)लिंबाचे लोणचे


३)लिंबापासून डिश वॉश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button