जनावरांना विषबाधेपासून अश्या प्रकारे वाचवू शकता; वाचा सविस्तर
सद्या ज्वारीचे पीक कोवळे आहे. त्यामुळे शेतामध्ये जनावरे गेल्यानंतर त्यांना ज्वारीच्या पिकाजवळ नेल्याने किंवा त्यांना ज्वारीच्या पीकाचे आकर्षण होऊन ते खाण्याची इच्छा होऊ शकते पण असे ज्वारीचे कोवळे पीक खाल्याने जनावरांना विषबाधा होऊ शकते अश्या विषबाधेला किरळ लागणे असे म्हणतात.
सायनोजिनिक ग्लुकोएड नावाचे रसायन ज्वारीच्या कोवळ्या पानामध्ये तसेच खोडामध्ये आढळून येते. त्याला धुरीण असेही ओळखले जाते. त्यामुळे जनावरांना विषबाधा होण्यास कारणीभूत ठरते. तसेच हैड्रोसायनिक ऍसिड तसेच प्रसिक ऍसिडचे प्रमाण जास्त असल्याने जनावरे मृत्युमुखी पडणयाची शक्यता असते.
शेळया, मेंढ्या, गायी ,म्हशी यांना ज्वारीची कोवळी पाने खाण्यासाठी दिल्याने ही विषबाधा अधिक वाढते.
आपल्या जनावरांना विषबाधा कशी झाली हे कसे ओळखावे…
⇛ ज्वारीची कोवळी पाने, खोड किंवा सायनोजिनिक ग्लुकोएड ज्या वनस्पती मध्ये असते अश्या वनस्पती खाल्याने जनावरांना लगेच विषबाधा होते.
⇛ जनावरांच्या नाकातोंडातून खूप फेस येतो
⇛ जनावरे अस्वस्थ होतात व त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो त्यांचा जीव गुदमरतो.
⇛ स्नायू आकुंचन पावतात व कमजोर झाल्याने जनावरे नीट उभे राहू शकत नाहीत.
⇛ स्नायूंच्या अर्धांगवायूमुळे, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जनावर दगावत
विषबाधा झाल्यानंतर उपचार काय करावे…
जनावरांनी ज्वारीची कोवळी पाने खाल्ली असतील तर त्यांना तात्काळ पशुवैद्यकीय डॉक्टरकडे तपासणी साठी घेऊन जावे.
जनावरांना विषबाधा झाली हे समजताच तात्पुरता इलाज म्हणून पशु तज्ञांच्या सल्ल्याने चार लिटर व्हिनेगर २० लिटर पाण्यात मिसळून जनावरांना पाजावे. किंवा ताबडतोब मोलॅसिसचे तोंडावाटे दोन डॉस द्यावेत हे मिश्रण जनावरांना थोड्या थोड्या प्रमाणात पाजावे. तसेच जनावरांना फुफुसांचा दाह होणार नाही याची काळजी घ्यावी.
पशुवैद्यकीय डॉक्टरच्या सल्ल्याने सोडियम थायोसल्फेट किंवा सोडियम नायट्रेट या औषधांची इंजेकशन द्यावे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत होतो.
महत्वाचे: ही सगळी उपचार पद्धती पशु वैद्यकीय सल्ल्यांच्या मद्तीने आणि सल्ल्यानेच करावी.
प्रतिबंधात्मक उपाय…
जनावरांना ज्वारीची कोवळी पाने खाण्यासाठी देऊ नये. किंवा विषारी पाने असणाऱ्याB वनस्पतीच्या जावळ जनावरे चार खाण्यासाठी फिरकणार नाहीत याची काळजी घ्यावी.
WEB TITLE: This is how you can save animals from poisoning; Read detailed