कृषी सल्ला

अश्या प्रकारे गुरांमधील गोचीड त्याचे नियंत्रण ठेवण्यासाठी करा ह्या उपाय योजना…

This is how to control goitre in cattle.

जनावरांमध्ये आढळणा-या विविध परजीवीपैकी गोचीड हा एक महत्वाचा बाहयपरजीवी (Parasite) आहे.जगाच्या पाठीवरील बहुतेक सर्व देशामध्ये हया परजीवीचा प्रादुर्भाव आढळतो. पशुवैदयकीय शास्त्रामध्ये हया परजीवाला (Parasitic) विशेष महत्व देण्याचे कारण म्हणजे, त्यामुळे वेळेतच गोचीड वर नियंत्रण आणणे गरजेचे असते.

1) हयाचा फैलाव बहुतेक सर्व देशामध्ये होतो.

2) जनावरांमधील काही महत्वाचे जीवघेणे रोग पसरविण्यास गोचीड कारणीभूत आहेत.

3) जनावरांची उत्पादन क्षमता कमी करतात.

रेशन मिळताना अडचण येते का? मग करा, “या” टोल फ्री नंबर वर एकदा कॉल; रेशन डीलर ची मनमानी येथून पुढे चालणार नाही…

गोचीडांपासून जनावरांना होणारी हानी -(Harm to animals)
जनावरांच्या अंगावरील गोचीड वेळेमध्ये काढली गेली नाही तर अधिक नुकसान होऊ शकते, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता जनावरांची काळजी घेणे फायदेशीर ठरते.
1) रक्तषोषण – सर्व प्रकारच्या गोचीड जनावराचें रक्त पितात (सुमारे 7 ते 14 दिवस) एक गोचीड सुमारे 1 ते
2 मिली रक्त पिते यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो.

2) गोचीडांच्या चाव्यामुळे जनावरांच्या शरीरांवर जखमा होतात व त्या जखमांवर किडे पडतात तसेच त्वचारोग होऊ शकतो.

राज्यामध्ये,” या” जिल्ह्यात पडणार गारपीट सह जोरदार पाऊस! वाचा सविस्तर हवामान अंदाज…

3) गोचीडांच्या चाव्यामुळे टिक पॅरालीसीस (Paralysis)हा आजारासुध्दा जनावरांना होऊ शकतो.

4) गोचीडांमुळे होणारे रक्तपेशी (Blood cell)रोग हे सर्वात महत्वाचे आहे त्यामध्ये बॅबेसीओसीस, ऍनाप्लासमोसिस, थायलेरीओसीस, ऐरलीकियोसीस व इतर रिकेटसीयल (Rickettsial) आजार जनावरांना गोचिडामुळे होतात .

या आजाराचे जंतू गोचीडांमध्ये त्यांच्या अनेक पिढयांमध्ये आढळून येतात व ते निरोगी पशूंमध्ये फैलाव करतात. म्हणून या आजारांचे निर्मुलन करण्यासाठी गोचीडांचा नायनाट करणे अत्यंत महत्वाचे आहे.

कृषी सल्ला:-बोरिक ॲसिड व झिंकची कमतरता असल्यास करा “हा” उपाय…

5) आर्थिक हानी –
जनावरांमध्ये गोचीडांमुळे होणा-या विविध आजारांमुळे जनावरे दगावतात .
तसेच दुध, मांस उत्पादन घटते त्यामुळे शेतक-याला प्रंचंड आर्थिक नुकसान (Financial loss) सोसावे लागते.

कृषी सल्ला:-बोरिक ॲसिड व झिंकची कमतरता असल्यास करा “हा” उपाय…

गोचीडांचे नियंत्रण :- (Gochida control)
गोचीडांचा पुर्णत: नायनाट करणे शक्य नसले तरी काही प्रमाणात त्याचे नियंत्रण करून जनावरांची उत्पादनक्षमता आपण टिकवून ठेवु शकतो गोचीडांचे नियंत्रण करण्यासाठी खालील उपाययोजना एकत्रितपणे अंमलात आणाव्यात-

1) जनावरांच्या अंगावरील गोचीडांचे निर्मुलन करणे.

2) जनावरांच्या गोठयातील गोचीडांचे निर्मुलन करणे.

3) जनावरांच्या चरण्याच्या ठिकाणी गोचीडांचा प्रादुर्भाव कमी करणे.

FACT CHECK: ऑक्सिजन लेवल चेक करण्याची “हे” (व्हिडिओ) आहे बनावट पद्धत या पद्धतीत पासून सावधान, तज्ञाचा इशारा…

यासाठी अंगावरील गोचीड काढून जाळून टाकावे व जनावरांची, गोठयाची व परिसराची स्वच्छता राखावी.
जनावरांच्या अंगावरील गोचीडांचे नियंत्रण करण्यासाठी विविध औषधे बाजारात उपलब्ध आहेत त्याचा वापर योग्य प्रकारे व पशुवैदयकाच्या मार्गदर्शनाखाली करावा त्यापैकी काही औषधे खालीलप्रमाणे –

1) ऍसूनटाल 2) डेल्टामेथ्रिन (क्यूटॉक्स) 3) ऍमीट्ाझ (एक्टोडेक्स) 4) आयुवेर्दीक मिश्रण (पेस्टोबॅन) ; कंसातील नावे ही टे्ड नावे आहेत.

मे महिन्यापासून होणार गॅस सिलेंडर पासून ते बँकिंग नियमावली मोठे बदल, कोणते मोठे बदल झालेत ते जाणून घ्या…

वरील गोचिड नाशक औषधे ही बाजारात वेगवेगळया नावाने (टे्रड नेम) उपलब्ध आहेत ही औषधे विषारी आहेत त्यांची मात्रा ही डॉक्टरच्या सल्यानेच वापरावी कारण कमी मात्रेने गोचीड मरत नाहीत व जास्त मात्रा झाल्यास जनावरांना विषबाधा होते तरी औषधे (Drugs)कंपनीच्या सुचनेप्रमाणे व डॉक्टरांच्या सल्यानेच वापरावीत.

जनावराच्या अंगावर व गोठ्यामध्ये ही औषधे एकाच वेळी फवारावीत. त्यांची मात्रा ही पशूवैदयकीय डॉक्टरच्या(.Of the doctor) सल्यानेच वापरावी.

स्त्रोत: वृत्तपत्र नुसार

हे ही वाचा
१)उसाच्या शेतीला द्या,” ह्या” नवीन पद्धतीने पाणी वाचेल वेळ आणि पैसा…

२)कोरोना काळामध्ये शेतीविषयक अडचण निर्माण झाल्यास कोठे संपर्क साधावा??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button