ऑस्ट्रेलिया (Australia) सध्या या बकऱ्यांमुळे चर्चेत आहे. या बकर्यांच्या किमती पाहून कोणाचाही विश्वास बसणार नाही. ऑष्ट्रेलियात (Australia) माराकेश नावाचा बकरा तब्बल 21 हजार डॉलर्स ला म्हणजेच 15 लाखाच्या वरती किमतीला विकला गेला.
वाचा –
माराकेश नावाचा बकरा 21 हजार डॉलरला विकला गेला –
माराकेश नावाचा बकरा 21,000 डॉलर (15.6 लाख रुपये) मध्ये विकला गेला आहे. बकऱ्याच्या एवढ्या मोठ्या किमतीने यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. द गार्डियनच्या वृत्तानुसार, अँड्र्यू मोस्लेने यांनी विकत घेतलेल्या बकर्याबद्दल सांगितले आहे की हा बकरा खूपच स्टायलिश आहे.
वाचा –
ब्रॉक नावाची शाळा 12 हजार डॉलर्सला –
पश्चिम न्यू साउथ वेल्समधील कोबर या शहरामध्ये बकरे लिलावासाठी ठेवण्यात आले होते. यापूर्वी, गेल्या महिन्यात ब्रॉक नावाची शेळी विकली गेली होती, ज्याने सर्वात महागड्या बकरीचा ($12,000) विक्रम केला होता.
मोस्ले यांना शेळीपालनाची (Goat) खूप आवड आहे. त्याने मागच्या वर्षी आणखी एक शेळी $9,000 ला विकत घेतली होती. मोस्ले म्हणाले की माराकेशसारख्या शेळ्या महाग आहेत कारण त्यांची संख्या खूपच कमी आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –