आरोग्यताज्या बातम्या

‘हे’ प्रमाणपत्र जपून ठेवा! भविष्यात विमा काढण्यासाठी आणि पासपोर्टसाठी लागेल या प्रमाणपत्राची आवश्यकता…

सध्या कोरोनाचा(Covid) काळ हा प्रचंड सर्वस्तरावर तापदायक ठरत आहे.त्यामुळे बहुतांशी नागरिक हे विमा (Insurance) काढत आहेत. तर कोणी लस घेण्यासाठी धावाधाव सुरू करत आहे. आरोग्य( health department) विभागामार्फत ही लस मोफत दिली जाते. तर काही ठिकाणी शुल्क आकारले जातात. ही लस घेतल्यानंतर त्याच्यासोबत एक प्रमाणपत्र दिले जाते. त्याच प्रमाणपत्रचा उपयोग कदाचित भविष्यात लागू शकतो. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता,जरी नागरिकांनी लस घेतली असली तरीही, तिथे आपली जबाबदारी संपते असे नाही.

कोरोनाचे सर्व नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे. लसीकरणानंतर येणारी पोच पावती प्रमाणपत्र जपून ठेवणे तितकेच गरजेचे आहे. कारण भविष्यात आरोग्य विमा( Health Insurance Company) कंपन्यांकडून प्रमाणपत्र मागवले जाण्याची दाट शक्यता आहे. प्रमाणपत्र नसेल किंवा त्यावरील तेरा अंकी कोड ( 13 digit code) नसेल तर कदाचित विम्याचा लाभ मिळू शकणार नाही किंवा तुमचा विम्याचा प्रिमियम सुद्धा वाढू शकतो.


तसेच परदेशी दौरा करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी, याची विचारणा होऊ शकते. एवढेच नव्हे तर लाइफ( Life Insurance) इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, हॉटेल्स, शाळा, त्यासाठी देखील याची आवश्‍यकता पडू शकते.
जास्त करून खाजगी विमा कंपन्यांच्या पॉलिसीमध्ये(Policy) यासाठी बदल करण्यात येईल किंवा मेडिक्लेम( Mediclaim) मिळवण्यासाठी कंपनी हे प्रमाणपत्र मागू शकते.


अशा प्रकारची माहिती पाहण्यासाठी, फळबागांची माहिती पाहण्यासाठी, माहिती तंत्रज्ञान पाहण्यासाठी. शेतीविषयक संशोधन, यशोगाथा, वाचण्यासाठी 🙂मी E शेतकरी चॅनेल फॉलो करा:
https://t.me/farmersdigitalmagazine

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button