गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांचा कमी खर्चिक पिकांकडे (Low cost crops) कल दिसून येत आहे. त्यामध्ये मेंथा, खस, पामारोजा, जिरेनियम, लेमन ग्रास यासह अनेक सुगंधी पिकांचे प्रमाण दिसुन येते. या पिकांची विशेष गोष्ट म्हणजे एक कमी खर्चिक आहे, कमी खर्चात चांगले पीक येते तसेच दुसरे म्हणजे दुष्काळी भागात लागवड करता येते. ही पिके कमाईचा उत्तम स्त्रोत साधन बनत आहेत. भारतातील शेतकऱ्यांना (Farmers in India) माहितीच्या अभावामुळे त्यांना नवीन पिके घेता येत नाहीत. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद देशभरात सुगंध मिशन अंतर्गत सुगंधी पिकांच्या लागवडीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाते. जाणून घेऊया या मोहिमे विषयी सविस्तर..
हे ही वाचा- मोठी बातमी: “पिकाला भाव मिळाला तरच मत देऊ”; शेतकरी नेत्यांची मोठी घोषणा, “या” दिवशी भारत बंद..
पुदिना वनस्पतीचे उत्पन्न व फायदे-
पुदिनाच्या लागवडीतून (From the cultivation of mint) शेतकरी चांगले उत्पन काढू शकतो. कमी खर्चिक व जास्त कष्ट न लागणारे हे पीक यामानाने उत्पन्न भरघोस निघते. परफ्यूम, साबण, निरमा, डिटर्जंट, तेल, केसांचे तेल, मच्छर लोशन, डोकेदुखीचे औषध आणि सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी पुदिनाचा वापर केला जातो. पुदिनाच्या उत्पादनाच्या बाबतीतही भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
सुगंध मिशन अंतर्गत प्रोत्साहन :-
या मोहिमेच्या अंतर्गत जी काही पिके घेतली जातात ती अत्यंत कमी खर्चिक लागवडीमध्ये (Low cost planting) होतात. दुष्काळग्रस्त भागातही या पिकांची लागवड करता येते. या व्यतिरिक्त, या पिकांना जास्त वेळ द्यावा लागत नाही तसेच त्यांच्या देखभालीसाठी जास्त कष्ट करावे लागत नाहीत. पुदिना पिकाचा या पिकांच्या यादीमध्ये समावेश आहे.
अॅपच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानांची माहिती :-
CIMAP ने मेंथा मित्र नावाचे अॅप लॉन्च केले आहे. याचा फायदा घेत शेतकरी बांध पुदिनाच्या प्रगत जाती आणि तंत्रांची अधिक माहिती घेऊन आपला नफा अधिक मिळवू शकता. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून त्यानंतर त्यामध्ये नाव, मोबाईल नंबर, राज्य आणि पिनकोड टाकून या अॅपमध्ये नोंदणी करून या अॅपच्या सुविधांचा लाभ घेऊ शकतात. सध्या हे अॅप हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा-