कांदा लागवडीचा विचार करत आहात? तर या अधिक उत्पादनाच्या जातींबद्दल जाणून घ्या व मिळवा भरघोस उत्पन्न..
खरीप आणि रब्बी दोन्ही या हंगामात शेतकरी कांद्याची लागवड (Onion Cultivation) करतात. आपल्याला माहीत आहे की रोजच्या भाज्यांमध्ये कांद्याचा समावेश केलाच जातो. यामुळे कांद्याची (Onion) मागणी अधिक असते. वेगवेगळ्या जातींच्या कांदा लागवडीतून (Onion Cultivation) शेतकऱ्यांचा चांगला नफा होऊ शकतो. चांगल्या उत्पन्नाच्या (income) बाजारात अनेक जाती उपलब्ध आहेत. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया..
वाचा –
1) पुसा लाल –
एका हेक्टरमध्ये किमान 200 ते 300 क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता ह्या जातीच्या कांद्यात असते. या जातीचा कलर लाल असतो. कांदा (Onion) कुठेही साठवला जाऊ शकतो. एका कांद्याचे वजन साधारण 70 ते 80 ग्रॅम असते. ह्या जातीच्या कांद्याचे पीक हे 120-125 दिवसात तयार होते.
वाचा –
2) भीमा सुपर –
ह्या जातींचा कांदा रांगडा म्हणूनही लावता येतो. हे खरिपामध्ये 22-22 टन/हेक्टर आहे. आणि रांगडे म्हणुन लावले तर 40-45 टन/हेक्टर पर्यंत उत्पन्न देते. खरिपामध्ये ह्या जातींचे पिक 100 ते 105 दिवसांत काढणीस तयार होते आणि रांगडे म्हणुन लावल्यास 110 ते 120 दिवसात काढण्यास तयार होते.
3) भीमा लाल –
हे पीक (Crops) खरीपमध्ये 105-110 दिवसांत आणि रांगडे आणि रब्बी हंगामात 110-120 दिवसात पिकते. खरिपाचे सरासरी उत्पादन हेक्टरी 19-21 टन आहे. आणि रांगड्या हंगामात 48-52 टन/हेक्टर आणि रब्बी हंगामात 30-32 टन/हेक्टर एवढे उत्पादन देतो.
4) भीम श्वेता –
110-120 दिवसात ह्या जातींचे पीक (Crops) काढणीसाठी तयार होते. ह्या वाणीचे कांदे (Onion) जवळपास 3 महिन्यांसाठी साठवले जाऊ शकते. खरिपात त्याचे सरासरी उत्पादन हेक्टरी 18-20 टन असते आणि रबीमध्ये 26-30 टन/हेक्टर उत्पादन देते. पांढऱ्या कांद्याची ही जात रब्बी हंगामाबरोबरच खरीप हंगामातही घेता येते.
वाचा –