“या” युवा शेतकऱ्यांनी शेती व्यवसायासाठी काढला नवीन पर्याय; 4 ते 10 लाख रुपये एकर उत्पन्न मिळणार..
शेतीमध्ये जास्तीतजास्त उत्पादन कसे काढायचे या विषयी युवा शेतकऱ्यांनी मार्गदर्शन केले आहे. व किती उत्पन्न घेऊ शकतो याचा अंदाज देखील लावलेला आहे. कळवाडी येथील युवा शेतकरी प्रशांत आप्पासाहेब खैरनार व समाधान खैरनार यांनी शतावरीसारख्या वनौषधींची लागवड करुन शेती व्यवसायाला नवी दिशा दिली आहे. या विषयी सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
मुळे धान्यपिके, कडधान्ये, भाजीपाला, फळपिके, फुलपिके या पारंपरिक पिकांव्यतिरिक्त नवा पर्याय आता उभा केला आहे. सर्वसाधारण प्रतीएकर साठ हजार इतका खर्च आला असून, शतावरीचे उत्पन्न येण्यास साधारण एक वर्ष ते दीड वर्ष इतका कालावधी लागतो.
4 ते 10 लाख इतके उत्पन्न –
या वनस्पतींच्या मुळ्यांचा आयुर्वेदिक औषधात जास्त उपयोग होत असून, ॲलोपॅथी व इतर उपचार पद्धतीत देखील वापर होतो. एका झाडापासून चार ते पाच किलो इतक्या मुळ्या निघतात व प्रतिकिलो पंधरा ते वीस रुपये इतका भाव मिळतो. वर्षभरात साधारण ७५ हजार रुपये महिना याप्रमाणे चार ते दहा लाख रुपये एकर इतके उत्पन्न मिळते, असे त्यांनी सांगितले.
चार एकर शेतीत चाळीस हजार रोपांची लागवड केली. या पिकासाठी माळमाथ्यावरील पाण्याचा निचरा होणारी, हलकी, रेताड किंवा मुरमाड जमीन व कमी पाणी ही वैशिष्ट्ये असणारी जमीन असल्याने त्यासाठीची रोपे त्यांनी उत्तराखंड येथून सहा रुपये पोहोच प्रतीरोप या भावाने मागवली. लागवडीअगोदर शेतीची पूर्वमशागत करताना त्यांनी नांगरणी करुन जमीन भुसभुशीत केली. ठराविक अंतरावर रोपांची लागवड करुन या पद्धतीने सेंद्रीय खत दिले. शतावरीची करार पद्धतीने शेती केली जात असून, विविध औषध निर्मिती कंपन्यांकडून वीस रुपये किलो या हमी भावाने त्यास भरपूर प्रमाणात मागणी आहे.
वाचा –
- मोठी बातमी; ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी मिळणार अनुदान, शेतकऱ्यांनो लवकर अर्ज करून घ्या “या” योजनेचा लाभ..
शतावरीचे औषधी उपयोग –
संधीवात, अर्धांगवायूत, मासिक पाळीच्या समस्यांवर, दुग्धवर्धक, हार्मोनचे कार्य, लैंगिक क्षमता वाढवणे, पेप्टीक अल्सर कमी करणे, अतिसारापासून सुटका, केसांच्या समस्यांवर, रक्तशर्करा कमी करणे, प्रतिकारक्षमता वाढवणे, पित्तशामक, कर्करोग टाळते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा