कोथींबीरीच्या “या” जातीं शेतकऱ्यांसाठी ठरतील फायदेशीर; या जातींबद्दल माहीत आहे का? नसेल माहीत तर पहाच..
कोथिंबीर (coriader) हे कमी कालावधीत व कमी उत्पादन (Production) करता देणारे फार महत्त्वपूर्ण पीक आहे. कोथिंबीरीची लागवड (Cultivation of coriader) भारतातील बहुतेक सर्वच राज्यात व्यापारी तत्त्वावर केली जाते. कोथिंबीरीच्या (coriader) विशिष्ट स्वादामुळे तिला वर्षभर सर्वत्र मागणी असते. कोथिंबीर (coriader) च्या काही जाती विषयी सविस्तर माहिती येऊ..
वाचा –
कोथींबीरीच्या जाती –
लाम.सी.एस.- चार ( साधना) –
ही जात रोग आणि किडींचा (Diseases and Insects) प्रतिकारक आहे. बियाण्यासाठी चांगले असणाऱ्या या जातीचे हेक्टरी 1000 ते अकराशे किलो उत्पादन (Production) मिळते. हे कोथिंबीरीचे जात उंच वाढणारी, भरपूर फांद्या असलेली आणि पाने असलेले झाड आहे.
लाम.एस.एस.-6
या जातीच्या भरपूर फांद्या असतात. ही जात मध्यम उंचीची आहे. मुख्य काडी रंगीत असते. ही जात भूरी रोगास प्रतिकारक आहे.
व्ही.1 व व्ही-2
या कट्वान पद्धतीच्या जाती असून त्यांच्यापासून 3 ते 4 खोडवे मिळत असल्यामुळे या जाती लोकप्रिय आहे.
वाचा –
- “या” फळाची बाजारात दमदार एंट्री; खरेदीसाठी ग्राहकांची होतेय प्रचंड गर्दी, पहा या फळाचे काय आहेत दर..
को-1
हे तामिळनाडू कृषी विद्यापीठाने (University of Agriculture) विकसित केलीली जात आहे. तेजात कोथिंबीर आणि धण्यासाठी चांगली आहे. या जातीचे 40 दिवसात हेक्टरी दहा टन कोथिंबिरीचे (coriader) उत्पादन मिळते. तर बियाण्याचे एकशे दहा दिवसात 500 किलो उत्पादन मिळते.
पंतहरित्मा
या वाणापासून सेक्टर 125 ते 140 क्विंटल उत्पादन मिळते. या जातीचे पाने मुलायम, सुवासिक, आकर्षक हिरव्या रंगाची व उंच वाढणारी, आठ ते नऊ फांद्या, बियाणे लहान आकाराचे, जांभळ्या रंगाचे,फाद्यांवर जांभळट छटा असतात.
वाचा –
प्रत्येक झाडावर 40 ते 50 फुलांचे गुच्छ असतात. स्टेम गोल या रोगास प्रतिकारक आहे. ही जात 155 ते 160 दिवसांत तयार होते. याशिवाय कोथिंबीरीचे आर सी आर (RCR) -41, गुजरात 1, गुजरात 2 हे राजस्थान आणि गुजरात मध्ये घेतले जाणारे चांगले वाण आहेत. तसेच कोथिंबिरीचे 65 टी, 5365 एनपीजे, 16 व्ही,1 व्ही 2, डी 92, डी 94, के 45 या कोथिंबीरीच्या स्थानिक आणि सुधारित जाती आहेत. तसेच वैशाली, दापोली या जाती देखील उत्तम आहेत.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा