कृषी सल्ला

गव्हाच्या या “तीन” जाती देतील अधिक उत्पन्न; भरघोस उत्पन्न काढायचे आहे का? मग पहाच…

These "three" varieties of wheat will yield more; Want to make a lot of money? Then look ..

गहू हे पीक रब्बी हंगामातील (Rabbi season) पीक आहे. गव्हाचा (Wheat) प्रगत आणि विकसित जातींची वापर केला तर अधिक उत्पन्न (income) निघू शकते. गव्हाच्या जातीची निवड करून योग्य अशी पिके घेऊ शकता. कमी खर्चात भरघोस उत्पन्न (income) काढायचे असेल तर गव्हाच्या या तीन जातीबद्दल माहीत असणे गरजेचे आहे.

करण श्रिया-

गव्हाच्या या नवीन जातीची पेरणीतून शेतकऱ्यांना फक्त उत्पादन (Production to farmers) नाही तर ब्लास्ट आणि पिवळा गंज यासारख्या रोगांचा धोकाही या जातीमध्ये कमी असतो. या गव्हाच्या जातीमध्ये भरघोस उत्पन्न निघते. गव्हाची ही जात जून 2021 मध्ये बाजारात आली. जवळपास 127 दिवसांमध्ये ही जात कापणीसाठी येते. एका हेक्टरी मध्ये 55 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकते.

हे ही वाचा- या” जिल्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा पीक विमा देण्यासाठी दिल्या सूचना; इतर ठिकाणीही लवकरच दिला जाणार पीक विमा..

करण वंदना-

या जातीला DBW 187 सुद्धा म्हणतात. गव्हाची ही जात गंगेच्या किनारी प्रदेशात चांगले उत्पादन देते. गव्हाची ही जात 120 दिवसांमध्ये तयार होते.या जातीपासून प्रति हेक्‍टर जवळजवळ 75 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. करण वंदना पेरणीनंतर 77 दिवसांनी आणि 120 दिवसांनी परिपक्व होते. त्याची सरासरी उंची 100 सेमी आहे तर क्षमता 64.70 क्विंटल प्रति हेक्टर आहे.

हे ही वाचा- मोठी बातमी: “पिकाला भाव मिळाला तरच मत देऊ”; शेतकरी नेत्यांची मोठी घोषणा, “या” दिवशी भारत बंद..

पुसा यशस्वी-

रसशोषक किडींना (Sucking insects) आणि तांबेरा रोगाला ही जात प्रतिरोधक मानले जाते. 5 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर हा काळ या जातीच्या लागवडीसाठी योग्य मानला जातो. या जातीपासून प्रति हेक्टर 57 ते 79 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते. व्हीट एचडी 3226 (पुसा यशस्वी) ही वाण नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. याचे वैशिष्ट्य हे आहे की आतापर्यंत उपलब्ध असलेल्या सर्व गव्हाच्या जातींपेक्षा जास्त प्रथिने आणि ग्लूटेन (Protein and gluten) आहे.

या तीन गव्हाच्या जातींची लागवड करून एक एकर मध्ये अधिक उत्पन्न घेऊ शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button