पूरग्रस्त भागातील या लोकांना मिळणार फक्त 5,6 टक्के व्याजदराने कर्ज..पहा तुम्ही यामध्ये मोडताय का?
These people in flood-hit areas will get loans at only 5.6 per cent interest rate. See, do you fall into this?
पूरग्रस्त भागातील दुकानदार,व्यापारी, व्यावसायिक लोकांना सरकारकडून मदत मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. दुकानदार,ठेकेदार,व्यावसायिक लोकांना फक्त 5,6 टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. ना-नफा तत्वावर भांडवल उभारणी खर्चापेक्षा थोड्या अधिक व्याज दराने बाधित दुकानदारांना कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतलेला आहे.सरकारने या पात्र लोकांना सरसकट 50 हजार रुपयांची मदत देण्याचा या अगोदरच निर्णय घेतला होता.आता पूरग्रस्तांना मदत मिळावी म्हणूनपुढाकार घेतला आहे.
राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरामुळे अनेक दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पूरग्रस्त लोकांना मदत व्हावी पुन्हा ते आपले व्यवसाय उभा करू शकतील या हेतूने जिल्हा सहकारी बँकांनी पुढाकार घेऊन एक माणुसकी दाखवलेली आहे.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसंदर्भात बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :