कृषी बातम्या

सोयाबीन पिकाच्या विम्यासाठी “या” जिल्हातील हि लोक पात्र आहेत; पहा याविषयी सविस्तर

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा संदर्भातील महत्वाची बातमी आहे. ३ ऑक्टोंबर २०२१ रोजी जिल्हास्तरीय समितीची बैठक झालेली आहे. आणि या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यात पिक विमा योजना राबविणारी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला प्रत्रक देण्यात आलेले आहे. या विषयी आपण सविस्तर माहिती पाहुया..

वाचा –

“संरक्षित” शेती योजनेला दिली मंजुरी; लाखों शेतकऱ्यांना होणार फायदा..

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२१-२२ मधील स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे होणारे नुकसान जोखीम अंतर्गत २५%, ३०% पुर्वसूचनांचे रेन्डम सर्वेक्षण करून नुकसान भरपाई करण्या बाबत
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक राबविण्याचा निर्णय वरील संदर्भ क्र.१ अन्वये घेण्यात आलेला आहे. त्यानुसार खरीप ज्वारी, बाजरी, मका, उडीद, मुग, तूर, सोयाबीन व कापूस हि पिके आहेत.

शासन निर्णय क्र. पिपिवियो-२०२०/ प्रक्र.४०/ ११-अ दि.२९ जून २०२० मधील परिच्छेद क्र.१०.०४ व ११.२ मध्ये नमूद केल्यानुसार हंगाम कालावधीत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखमेच्या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूखलन, गारपीट, ढगफुटी किंवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते.

वाचा –

शासन निर्णय क्र. पिपिवियो-२०२०/ प्रक्र.४०/ ११-अ दि.२९ जून २०२० मधील मुद्दा क्रमांक २.७,१.४/२.७,२.२,१०.४,११.२ आणि संदर्भ क्रमांक २ अन्वये स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या जोखीमिमध्ये जर अधिसूचित पिकाचे बाधित क्षेत्र हे एकूण पेरणी क्षेत्राच्या २५ टक्के पर्यंत असेल तर वैयक्तिक स्तरावर २५ ते ५० टक्के पर्यंत असेल तर अधुसुचीत क्षेत्रातील प्राप्त २५ टक्के पुर्वसुचनांचे आणि ५० टक्के पेक्षा जास्त असेल तर अधिसूचित क्षेत्रातील प्राप्त ३० टक्के पूर्वसूचनांचे सर्वेक्षण करणेच्या सूचना आहेत व अधिसूचित क्षेत्रातील प्राप्त शेतकरी (पिक योजनेत सहभागी झालेले व पिकाचे नुकसानीची विहित वेळेत पूर्वसूचना दिलेले) नुकसान भरपाईस प्राप्त ठरतील.

या तरतुदीनुसार विमा कंपनीच्या संदर्भीय पत्र क्र.३ नुसार जिल्ह्यातील पुढील प्रमाणे महसूल मंडळामध्ये २५ टक्के पेक्षा जास्त पूर्वसूचना प्राप्त झालेल्या आहेत.

उस्मानाबाद – उस्मानाबाद शहर, उस्मानाबाद ग्रामीण, ढोकी, तेर, पाडोळी, बेंबळी, केशेगाव, जागजी यामंडळामध्ये सोयाबीन पिकाच्या नुकसानाच्या शेतकर्यांनी पूर्वसूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये सर्वच मंडळाचे ६० टक्के पेक्षा जास्त पूर्वसूचना प्राप्त झालेल्या आहेत.

वाचा –

तुळजापूर तालुक्यामधील – तुळजापूर, मंगरूळ, इटकुळ, सावरगाव,सलगरा दि जळकोट, नळदुर्ग या भागातील शेतकर्यांनी सोयाबीन पिकासाठी पूर्वसूचना दिलेल्या आहेत.

उमरगा- उमरगा, दाळिंब, भारंगवाडी, मुळज, मुरूम, लोहारा. ३० ते ३५ टक्यांपर्यंत पूर्वसूचना प्राप्त झालेल्या आहेत.

लोहारा – लोहारा, माकणी या ठिकाणच्या ६१ टक्केपर्यंतच्या पूर्वसूचना प्राप्त झालेल्या आहेत.

भूम – मानकेश्वर २७ टक्के

वासी – तेरखेडा,पारगाव ३२ टक्के पूर्वसूचना.

कळंब – कळंब,इटकुर, येरमाळा, मोहा, शिराढोण, गोविंदपूर ९१ टक्क्यांपर्यंत.

या पिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणानुसार आलेल्या डेटानुसार या भागातील शेतकरी पिक विम्यासाठी पात्र होणार आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button