पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी हे कागदपत्रे गरजेचे, अन्यथा पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत..
These documents are required to avail PM Kisan Yojana, otherwise the money will not be credited to your account.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi) योजनेत अनेक फसवणूक झाल्याची नोंद केली जात आहे. अशी फसवणूक रोखण्यासाठी मोदी सरकारने नोंदणी प्रक्रियेत बदल केला आहे. सरकारने आता पीएम किसान योजनेत (Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi) नोंदणीसाठी रेशनकार्ड अनिवार्य केले आहे. म्हणजेच रेशनकार्डशिवाय तुमच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार नाही. या प्रोसेस बद्दल सविस्तर माहिती घेऊया…
वाचा –
शिधापत्रिका क्रमांक गरजेचा –
पीएम किसान पोर्टलवर (Pradhan Mantri Kisan portal) तुमचा शिधापत्रिका क्रमांक नोंदणीकृत झाल्यानंतरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्याच वेळी, शिधापत्रिकेच्या अनिवार्य गरजेसोबतच, नोंदणीच्या वेळी केवळ कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी (पीडीएफ) बनवाव्या लागतील आणि पोर्टलवर अपलोड कराव्या लागतील.
वाचा –
15 डिसेंबर रोजी 10 वा हप्ता जमा होणार –
तसेच आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्रांच्या हार्ड कॉपीची अनिवार्य सादरीकरणेही रद्द करण्यात आली आहेत. लाभार्थ्यांना या कागदपत्रांची पीडीएफ फाइल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागेल. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होण्याबरोबरच नवीन प्रणालीमध्ये योजना अधिक पारदर्शक होणार आहे.
पुढील हप्ता १५ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे –
- तुमच्यासाठी बँक खाते क्रमांक असणे अनिवार्य आहे कारण सरकार DBT द्वारे शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित करते.
- बँक खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
- तुमच्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. त्याशिवाय तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
- पीएम किसानच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर तुमची कागदपत्रे अपलोड करा.
- आधार लिंक करण्यासाठी तुम्ही फार्मर कॉर्नरच्या पर्यायावर जा आणि आधार तपशील संपादित करा या पर्यायावर क्लिक करून अपडेट करा.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा