कृषी सल्ला

Cotton Rate | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! बाजारात घटली कापसाची आवक; विक्रीची घाई करू नका, दरात होणार मोठी वाढ

Cotton Rate | देशातील कापूस दर आता नरमले आहेत. कापसाच्या दरात चढ उतार सुरू आहे. कापसाचे दर (Cotton Rate) आंतरराष्ट्रीय बाजारात वाढले की वाढतात. तसेच बाजारातील (Financial) आवकेवर कापसाचे दर अवलंबून असतात. पण आता बाजारातील कापसाची (Cotton Market) आवक घटली आहे. त्यामुळे कापसाच्या दरात सुधारणा होण्याचा अंदाज आहे. म्हणूनच शेतकऱ्यांनी (Department of Agriculture) कापसाची विक्री करण्याची घाई करू नये.

बाजारातील कापसाची आवक घटली
खरं, तर देशभरातील बाजारात 1 ऑक्टाेबर ते 7 डिसेंबर या कालावधीत कापसाची (Agricultural Information) आवक किमान 12.38 टक्क्यांनी घटलीय. या काळात मागील हंगामाच्या तुलनेत किमान 95 लाख गाठी कापूस देशभरातील बाजारात येणे अपेक्षित असते. पण 49 लाख 67 हजार 700 गाठी कापूस बाजारात (Cotton Market) आलाय. त्यामुळे आता दरात सुधारणा होण्याचा अंदाज आहे.

वाचाशेतकऱ्यांसाठी खुशखबर! नियमित कर्जदारांच्या खात्यात जमा होणार व्याजाचे पैसे, जाणून घ्या सविस्तर

किती आहे देशभरातील कापसाची आवक?
• पंजाब – 2,74,000 – 69,300
• हरियाणा – 4,85,000 – 3,00,000
• राजस्थान – 10,36,000 – 9,33,000
• गुजरात – 21,00,500 – 15,35,000
• महाराष्ट्र – 17,73,000 – 6,27,000
• मध्य प्रदेश – 6,66,000 – 4,06,000
• तेलंगणा – 7,34,500 – 2,92,500
• आंध्र प्रदेश – 3,36,000 – 3,13,800
• कर्नाटक – 6,46,500 – 4,04,000
• तामिळनाडू – 31,500 – 60,100
• ओडिशा – 51,000 – 27,000

वाचाबाजारात लाल मिरचीचा ठसका वाढला! आवक कमी असल्याने मिळतोय ‘इतका’ दर, जाणून घ्या अजूनही दरात होईल का वाढ?

शेतकऱ्यांनी विक्रीची घाई करू नये
बाजारात आता कापसाची आवक घटली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम दरावर होऊ शकतो. त्याचबरोबर इतर देशांसाेबतच भारतात देखील कापसाच्या उत्पादनात (Cotton Production) घट होण्याचा अंदाज आहे. म्हणूनच शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची घाई करू नये. तर टप्प्याटप्प्याने कापूस विक्री केल्यास व बाजारातील कापसाची आवक स्थिर राहील. त्यामुळे दरात सुधारणा होईल आणि शेतकऱ्यांना कापसाच्या दराबाबत दिलासा मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! The arrival of cotton in the market decreased; Don’t rush to sell, there will be a big increase in the price

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button