ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांसाठी होते पुरस्कारांची बरसात! तुम्हीही होऊ शकता लाभार्थी!…

There was a rain of awards for farmers from the central government! You too can be a beneficiary!

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतामध्ये औद्योगिकरणामध्ये भरघोस वाढ झालेली आहे. यामुळे लोक खेडी सोडून शहराकडे चालू लागले आहेत. युवकांनी शेतीकडे वळले पाहिजे यासाठी केंद्र सरकार आणि खाजगी संस्था आमच्या शेतीसुधारणा चे घेऊन आहेत. केंद्र सरकार आणि खाजगी संस्था (Central Government and Private Institutions) शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पुरस्कार देऊ करतात.

भारतातील जवळजवळ पन्नास टक्के लोक हे शेती करतात. शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग(Many new experiments in agriculture) करत असतात, केंद्र सरकार सुद्धा आपल्या नवनवीन योजना शेती करण्याकरता आणत आहे. शेती साठी आयसीएआर (ICAR) ही संस्था अनेक पुरस्कार देत असते. भारतीय कृषी संशोधन परिषद ही कृषी मध्ये काम करणारी एक मोठी संस्था आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळे पुरस्कार देत असते.


शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खालील पुरस्कार दिले जातात.

1. पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योसदय कृषी पुरस्कार हा कृषी पुरस्कार हे प्रत्येक वर्षाला अल्पभूधारक, लहान आणि भूमिहीन शेतकर्‍यांच्या योगदानास मान्यता देण्यासाठी दिले जातात.
बक्षीस -स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रकाव्यतिरिक्त एक लाख रुपये.

2. एन. जी. रंगा शेतकरी पुरस्कार- शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शेतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी एन जी रंगा शेतकरी पुरस्काराची स्थापना केली गेली.
बक्षीस- स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रकाव्यतिरिक्त एक लाख रुपये.

3. जगजीवन राम अभिनव किसान पुरस्कार- शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपले उत्पन्न वाढविणार्‍या शेतकर्‍यांना दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर 3 पुरस्कार दिले जातात.
बक्षीस- एक लाख रुपये रोख रक्कम, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह.

4. महिंद्रा ग्रुप (Mahindra group) महिंद्रा ग्रुपच्या वतीने नेहमीच शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीन प्रयोगासाठी दरवर्षी महिंद्रा समृद्धी भारत कृषी अवॉर्ड अंतर्गत राष्ट्रीय आणि क्षेत्रीय स्तरावर पुरस्कार देते.(Every year Mahindra Samrudhi Bharat Krishi Award for new experiment is given nationally and regionally.) कृषक सम्राट (पुरुष गट), कृषी प्रेरणा सन्मान (महिला), कृषी युवा सन्मान (युवा) देण्यात येतात. बक्षीस – राष्ट्रीय पातळीवर 2.11 लाख आणि क्षेत्रीय स्तरावर 51 हजारांची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा:

1. एनजी’ ट्रॅक्टर्समुळे शेतकऱ्यांना होणार भरघोस फायदा!

2. ‘स्वामित्व योजनेसंदर्भात’ सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय! वाचा तुम्हाला ‘या’ योजनेचा फायदा कसा होणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button