कांद्याचे पीक हे महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. खरीप तसेच रब्बी हंगामात सुद्धा कांदा पीक (Onion crop during kharif as well as rabi season) घेतले जाते. नाशिक, नगर, पुणे या विभागात कांद्याचे पीक हे मोठ्या प्रमाणावर लागवड आणि पेरणी पद्धतीने घेतली जाते. कांद्याच्या पिकांमध्ये तण व्यवस्थापन करणे फार गरजेचे असते. पिकाबरोबर तणाची वाढ होऊन ते जमिनीतील मूलद्रव्य, अन्नद्रव्ये, पाणी, सूर्यप्रकाश,हवा यामध्ये भागीदार होते. त्यामुळे पिकाच्या उत्पादनावर फार मोठा परिणाम दिसून येतो.
तणाची वाढ होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी खबरदारी घेणे गरजेचे आहे. बियाण्याची पेरणी केल्यानंतर लवकरच पेंडा मिथालीन 38.7 टक्के घटक असणारे दोस्त सुपर तन नाशक 700 मिली प्रति एकर(Penda Methylene with 38.7 per cent component Dude Super Body Disinfectant 700 ml per acre) एवढ्या प्रमाणात घेऊन कोरड्या जमिनीत फवारणी करावी. त्यानंतर लगेच शेतामध्ये पिकास पाणी द्यावे.तसेच पिकासोबत होऊन येणारे तण हे नियंत्रण येण्यास मदत होईल.
तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणत्या योजना आल्या आहेत व कोण आहेत लाभार्थी? ऑनलाइन पद्धतीने असे पहा …
उभ्या पिकांमधील गोल व लांब पानांचा तन व्यवस्थापनासाठी ऑक्सीफ्लॉवरफॅन घटक असणारे गोल तननाशक 1 मिली आणि क्वीझोलफोप इथील घटक असणारे टारगा सुपर दोन मिलि प्रति लिटर (1 ml of round ointment containing oxyflowerfan component and Targa Super 2 ml per liter containing quizolphop) याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. ही फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचे आहे. कांद्याच्या पिकांमधील तण व्यवस्थापन करण्याचे फार महत्वाचे आहे. यामुळे पिकांमधील उत्पादन क्षमता वाढून आपल्याला चांगले उत्पन्न मिळू शकते.
हे ही वाचा…