भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सहाय्याने सोयाबीनच्या विविध जाती विकसित केले गेले आहेत. सोयाबीनच्या या नवीन जातींची वैशिष्ट म्हणजे उत्पादकतेच्या गरजेनुसार कमी कालावधीत तयार होणाऱ्या, तसेच यांत्राद्वारे काढण्यास उपयुक्त, किडीस प्रतिरोधक, तसेच पोषण युक्त बियाण्यांचा शोध लावला आहे अशी माहिती संस्थेचे डॉक्टर ओक, डॉक्टर जय भाय यांनी दिली कोणत्या आहेत या नवीन जाती व त्याची काही वैशिष्ट्ये आहेत हे आपण पाहणार आहोत
१) MASCS १४६०:
महाराष्ट्र ,कर्नाटक ,आंध्र, तेलंगणा, तमिलनाडु, या प्रदेशात 90 दिवसात काढण्यास तयार होणारे हे बियाणे आहे.
२) बियाण्यांचे असे वैशिष्ट्य आहे की या झाडास तीन ते चार फांद्या लागून ते 40 ते 45 सेंटिमीटर इतकी उंची असेल.
३) तसेच त्याच्या शेंगा लवविरहित असून पिवळ्या रंगाच्या तीन दाणे असून फुटण्यास प्रतिबंधक असे हे बियाणे आहे बियांचा आकार मध्यम व गोलाकार असून फिकट काळे रंगाचे हायलम आहे.
४) हे पीक यंत्राने सहज कापणी शक्य आहे. तसेच यावर मावा, खोडमशी, चक्री भुंगा, पाणी खाणारी व पोखरणारी आळी यास प्रतिकरक्षम आहे.
५) या बियाण्यामध्ये 18 टक्के तेल व 41% प्रतिनिधी देखील आहेत.
६) या बियाण्यांचा पिकांमधून प्रति हेक्टर 22 ते 38 क्विंटल इतके उत्पन्न निघू शकते.
२) MASCS १५२०:
१) मध्य प्रदेश ,महाराष्ट्र( विदर्भ),(मराठवाडा) गुजरात, या प्रदेशात हे बियाणे लागवडीची शिफारस केली गेली आहे .
२) हे बियाणे शंभर दिवसात पीक काढणीस तयार होईल झाडास तीन ते चार फांद्या पाण्याची उंची सरासरी 56 सेंटीमीटर पर्यंत असेल.
३) एका झाडाला सरासरी 48 ते पन्नास पर्यंत शेंगा, एका शिंगे मध्ये तीन दाणे बियांचा आकार मध्यम गोलाकर व काळपट रंगाचे हायलम
४ )ह्या बियाण्यामध्ये 18% तेल व 40 टक्के प्रथिने देखील आहे.
या जातींना केंद्रीय उपसमितीने शेतकऱ्यांच्या शेतावर लागवडीकरिता आधी सूचित करून प्रसारित करण्यासाठी मान्यता दिली गेली आहे ,या पिकांच्या बियाण्यांच्या जाती २०२२ मधील खरीप हंगामा मध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
१)‘अशी करा’, सुगंधित गवातची लागवड आणि मिळावा भरघोस उत्पन्न !
२) उन्हाळ्यात फळबागेची ‘ घ्या’ अशी काळजी व करा या उपाययोजना…