मागील वर्षी सोयाबीन (Soybeans) मधील तुटवडा प्रचंड होता. त्यामध्ये सोयाबीन मधील बियाणे याबाबत तक्रारी ही प्रचंड होत्या. सोयाबीनची मागणी आणि पुरवठा यात मोठी दरी निर्माण झालेली आहे. त्यामुळे सोयाबीन मधील तेजी अजूनही कायम आहे. सोयाबीन पिकाला कधी नैसर्गिक आपत्ती, तर कधी अनिसर्गिक संकटामुळे सोयाबीनचे उत्पादनात घट पडली पडते तर कधी बाजारातील सारख्या बदलणाऱ्या किमती यामुळेदेखील सोयाबीनच्या किमतींवर फरक पडतो.
हेही वाचा: पीक काढणीनंतर ची सगळी कामे होतील या एकाच मशीन ने, जाणून घ्या यंत्राबद्दल ची संपूर्ण माहिती…
गेल्या तीन ते चार वर्षांपासून दुष्काळ, कीड, अतिवृष्टी इत्यादी कारणांमुळे उत्पादनात घट व बाजारात सुद्धा हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे, त्यामुळे सोयाबीनचे उत्पादनात चांगलीच निम्म्याहून अधिक घट निर्माण झाली आहे.
सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री चालू केली आहे. मात्र बाजारातील तेजी पाहून अद्यापही अनेक शेतकरी (Farmer) विक्रीसाठी थांबले आहेत. बाजारात सोयाबीनची आवक कमी आहे. मागणी (Demand) व पुरवठा (Supply) यांच्यात दरी निर्माण झाल्यामुळे तिची वाढत असल्याचे सांगितले जात आहे. देशात नव्या पिकाची आवक ही ऑक्टोबर महिन्यापर्यंत होईल असे वाटत नाहीत्यामुळे सोयाबीन चा तुटवडा मोठा जाणवेल हे निश्चित आहे.
हेही वाचा: 26/04/2021 दुपारच्या खास बातम्या आता वाचा पण आणि ऐका पण फक्त एका क्लिक वर…
हंगामामध्ये सोयाबीनचा दर साडेसात हजार रुपये पेक्षा अधिक पोहोचू शकतो असा अंदाज लावला जात आहे.यंदाच्या हंगामात चांगले दर निश्चितच मिळतील असे काही बाजार विश्लेषक यांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाचे भाव वाढले असल्या कारणाने सोयाबीनचे भाव देखील तेजीत आहेत त्यामुळे ते काही शेतकऱ्यांना भाव मिळाला ते खुश आहेत, तर काही शेतकरी सोयाबीन विकल्या कारणाने पश्चाताप करत आहेत.
सध्या सोयाबीनला सात हजार तीनशे च्या जवळपास बाजार भाव मिळत आहेत.
हेही वाचा… 1. 1. ऊसदराचा (एफआरपी) प्रश्न पुन्हा पेटणार! जाणून घ्या काय आहे या मागचे कारण?