कृषी सल्ला

जाणून घ्या : मटकी लागवडी ची संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर…

The whole process of Matki cultivation with one click

मटकी ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलाच्या फॅबॉइडी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना ॲकॉनिटिफोलिया आहे. ती मूळची भारत आणि पाकिस्तान या देशांतील आहे

जमीन (Land)
हलकी व मध्यम माळरानाची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी.

खते (Fertilizers)
उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी.
हेक्टरी ५ टन शेणखत / कंपोस्ट खत द्यावे. मृगाचा पाऊस झाल्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात.

सोयाबीन उत्पादकता कमी असण्याची महत्वाची कारणे व उत्पादकता वाढविण्यासाठी आवश्यक घटक…

[metaslider id=4085 cssclass=””]

लागवड (Planting)
साधारणतः ६०-७० मि. लि. पाऊस झाल्यानंतर जूनच्या अखेरपर्यंत पेरणी करावी.पिकाचा कालावधी ३.५ ते ४ महिन्यांचा आहे. हेक्टरी बियाणे प्रमाण : १२ ते १५ किलो. पेरणी अंतर : दोन ओळीत ३० सें.मी. व दोन रोपात १० सें.मी. ठेवावे.

बीजप्रक्रिया (Seed processing)
१ किलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम कार्बेन्डेझीम चोळावे यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धन १० ते १५ किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.

 ‘भुईमूग लागवड’ विषयी संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…

‘आले पिकांवरील’ कीड व त्यावरील उपाय योजनेची संपूर्ण माहिती…

खत व्यवस्थापन
१२-१५ किलो नत्र आणि २५-३० किलो स्फुरद या प्रमाणे रासायनिक खताची मात्र द्यावी. म्हणजेच ७५ किलो डीएपी प्रति हेक्टर प्रमाणे पेरणी करताना खत द्यावे.

काळजी (Care)
पीक २०-२५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी.
पेरणीनंतर ३० ते ३५ दिवस पीक तणविरहीत ठेवावे.

हेही वाचा:

1. कापसावरील गुलाबी बोंड आळी ला रोखण्यासाठी CICR ने आणला नवा फॉर्मुला…

2. “या” जातीच्या कोंबडी द्वारे मिळेल वर्षाकाठी 230 अंडी पहा सविस्तर माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button