ड्रोनचा वापर शेतीसाठी फायदेशीर; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याकडे केंद्र सरकारचे लक्ष..
The use of drones is beneficial for agriculture; Central Government's focus on increasing farmers' income.
केंद्र सरकार (Central Government) शेती व्यावसायासाठी (Farming business) नवनवीन योजना आणण्याचा प्रयत्न करत असते. सध्या शेतामध्ये ड्रोनचा वापर करण्याकडे सरकार लक्ष देत आहे. सरकारने डिजिटल कृषी मिशन योजना (Digital Agriculture Mission Plan) जी काढलेली आहे त्यावर सरकार लक्ष देणार. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व फायदे करून देणे या उद्देशाने सरकार प्रयत्न करत आहे.
कृषी रसायनांच्या उत्पादनात भारत (India) देश हा जगात चार नंबर वर आहे. यामुळे सरकारने कृषी रासायनिक (Agrochemical) क्षेत्राचा आवखा वाढवला आहे. म्हणून जागतिक पुरवठा मध्ये भारत देश आपली महत्वाची भूमिका बजावू शकणार आहे. कोरोना संकटात शेतकरी वर्गाने मागे न सरता पीक उत्पादन काढले आणि जगाला जगवले आहे. शेतकऱ्यांना शेतामध्ये अधिक उत्पादन घेता यावे यासाठी सरकार नवनवीन उपक्रम राबवत आहे व शेतकऱ्यांना पुरेशी माहिती मदत पोहचवण्यासाठीही प्रयत्न चालू आहेत.
वाचा: मोठी बातमी; राज्यातील 44 साखर कारखाने काळ्या यादीत, साखर आयुक्तांचा निर्णय…
७० टक्के पीक संरक्षण –
CLI संयुक्तपणे ७० टक्के पीक सरंक्षण (Crop protection) करते तर ९५ टक्के रेणू देशात आणण्यात CLI ची भूमिका आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर CLI सदस्य कंपन्या करत आहेत तसेच जवळपास ६ अब्ज डॉलर खर्च जागतिक विकास संशोधनावर आणि विकासावर करते. असे नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले आहे.
कृषी सुधारण्यासाठी कायदे –
कृषी (Agricultural) सुधारणा कायद्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आपली उत्पादने जिथे विकायची आहेत तिथे तो विकू शकणार आहे. चांगली शेती केल्याने चांगले उत्पादन होईल व भारताचा विकासही होईल. असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले. तसेच कंत्राटी शेती या नवीन कायद्याने सुद्धा कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा राहील व शेतकरी चांगली मेहनत करून शेतकऱ्यांना फायदा होईल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –