कृषी तंत्रज्ञान

या शेतकऱ्याने पिकवली भाजीपाल्यांची अनोखी शेती; तेही फक्त दोन बाय चार फुटात..

रोजचे फळ भाजीपाला (Fruits and vegetables) सेंद्रिय पद्धतीने (Organic methods) घरच्या घरी तुम्ही पिकवू शकता. पुण्यातील सुरज मांढरे यांनी ही अनोखी शेती (Agriculture) पिकवली. तेही अगदी कमी जागेत आणि कमी खर्चात. ही खूप कमी खर्चातील शेती आहे यामध्ये अधिक उत्पन्न घेऊ शकता. व घरच्या घरी भाज्यांचे उत्पादन (income) घेता येईल असे ऑरगँनिक टॉवरची निर्मिती (Construction of the Organic Tower) करून उत्तम पालेभाज्यांची शेती होऊ शकते. सूरज मांढरे हे घरातूनच ही शेती (Agriculture) करीत आहेत. ती कशी आपण याविषयी सविस्तर माहिती घेऊया..

वाचा –

जवळपास 60 भाज्यांचे उत्पादन –

जवळपास 60 भाज्यांचे उत्पादन मांढरे कुटुंबाने घेतले आहे. ऑरगँनिक व्हेजिटेबल टॉवर (Organic Vegetable Tower) म्हणजे फायबरच्या दोन बाय चार फुटांचा हा टॉवर (Tower) आहे. त्यात माती टाकून भाजीपाला उगवेल अशी मोकळी जागा असते. पाण्याची आणि खताची (Fertilizer) यांनी योग्य सोय केली आहे. त्यामुळे एखाद्या सुपीक जमिनीवर येणाऱ्या भाजीपाल्या प्रमाणे या ऑरगँनिक टॉवरमध्ये (Organic Tower)भाज्यांचे उत्पादन घेता येते.

वाचा –

भाजीपाला घेण्यासाठी टॉवर शेतीची निर्मिती –

कमी जागेत कमी खर्चात घरच्या घरी गरजेचा भाजीपाला घेण्यासाठी या टॉवर (Tower) शेतीची (Agriculture) निर्मिती केली आणि ही भन्नाट शक्कल लढवली ती भोर दिवळे गावातील सूरज मांढरे या शेतकऱ्याने. या ऑरगँनिक टॉवर (Organic Tower) मुळे शहरी भागातील नागरिकांना घरीच भाजीपाल्याचे उत्पादन (income) घेता येणार आहे. ऐवढच नाही तर भाज्यांसोबत फुलझाडांची ही लागवड (Planting of flowers) कमी जागेत करता येणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button