यशोगाथा

शेतकरी कुटुंबातील सुनेची जिद्दीची कहाणी स्वकष्टाने मारली ” या ” पदावर बाजी..

The story of the stubbornness of Sune from a farmer's family was killed with difficulty.

मनामध्ये जिद्द असल्यास यश देखील नशिबाला गवसणी घालते, आज आपण अशाच एका आदिशक्ती मधील स्त्री ची यशोगाथा पाहणार आहोत खरेतर ती एक आई आहे, ती सून आहे ,ती बायको आहे ,ती जाऊ बाई आहे ,अशी अनेक रूपांमध्ये असूनही तीने स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याकरिता स्वकष्टाने उपनिरीक्षक पदावर मजल मारली हि कहाणी आहे शितल मेंगडे पाटील राहणार मेंगडेवाडी यांची.

शीतल या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील 2012 मध्ये त्यांचा विवाह सतीश यांच्याशी झाला. मात्र मनामध्ये वेगळं काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती, लग्नानंतर प्रपंच, मुलगी, घर संसार पाहून त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली व या परीक्षेत त्यांना घवघवीत यश प्राप्त होऊन ट्रेनिंग पूर्ण केले ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर त्या मुंबई उपनिरीक्षकपदी विराजमान झाल्या.

रक्ताचे डांबर केल्याशिवाय यशाचा रस्ता दिसत नाही असे विश्वासराव नांगरे पाटील म्हणतात , परंतु याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शीतल मेंगडे पाटील

शीतल यांचे माहेर तालुक्यातीलच जवळेतील लायगुडे परिवार आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जवळे येथे तर माध्यमिक शिक्षण निरगुडसर येथे झाले.

त्यांचे पती हे बजाज कंपनीमध्ये कर्मचारी आहेत त्यांनी वेळोवेळी आपल्या पत्नीस मार्गदर्शन व प्रोत्साहन केले तसेच घरामध्ये सासू सासरे ,जाऊ ,दिर यांनीदेखील त्यांना प्रोत्साहन केले.

शीतल मेंगडे पाटील यांना सात वर्षाचे कन्यारत्न देखील आहे आईच्या यशामुळे सर्व कुटुंब भारावले आहेत तसेच पंचक्रोशी मध्ये त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button