बिग ब्रेकिंग! राज्य सरकार ‘या’ शेतकऱ्यांची करणार कर्जमाफी; त्वरित तपासा तुम्ही आहात का पात्र?
Eknath Shinde | कोरोना महामारीमुळे देशातील लाखो कुटुंबे निराधार झाली होती. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांना उद्योग धंद्यामध्ये आर्थिक (Financial) भुर्दंड सोसावा लागला. इतकंच नाही, तर कोरोना विषाणूमुळे प्रचंड जीवितहानी झाली होती. त्यामुळे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती दगावल्याने अनेकांवर आर्थिक कर्जाचा (Loan) डोंगर उभा राहिला. सामान्यांप्रमाणे शेतकरी (Agriculture) कुटुंबावर देखील हा डोंगर उभा राहिला. आता याच कुटुंबांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
वाचा:शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनाचे ‘इतके’ कोटी वितरीत; त्वरित तपासा खात्यात पैसे आले का?
राज्य सरकार करणार कर्जमाफी
कोरोनामुळे अनेक नवविवाहिता, काही चिमुकली, वयस्क आई-वडिल असे कुटुंबीय निराधार झाली होती. यांच्यासाठी राज्य सरकार (State Government) निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. काळात मरण पावलेल्या व्यक्तीच्या नावावरील कर्जाचा (Loan) भार त्याच्या कुटुंबीयांवर पडला आहे. हाच भार उतरवण्यासाठी राज्य सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
वाचा: बिग ब्रेकींग! शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्र्यांचा वीज कापणीबद्दल मोठा निर्णय; दिले महत्वाचे निर्देश
कोणाची होणार कर्जमाफी?
कोरोना काळात कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या नावावरील कर्जाची (Bank Loan) माफी करण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारने तयारी दर्शवली आहे. याच कर्जाबाबत सर्व माहिती जिल्हा बँका, नागरी सहकारी बँका व पतसंस्थांकडून तात्काळ मागवण्यात आली आहे.
राज्य सरकार निराधारांना आता ठोस मदत करणार आहे. तसेच कर्ज भरण्याची परिस्थिती असलेल्यांना आर्थिक सवलत देण्यात येईल. त्याचबरोबर कर्ज भरू न शकणाऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात येणार आहे. तसेच यामध्ये शेतकरी (Agricultural Information) दगावलेल्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या दरात झाला चढ-उतार! त्वरित जाणून घ्या उडीद, तूर अन् सोयाबीनचे ताजे बाजारभाव
- बिग ब्रेकिंग! लम्पी आजारामुळे दगावलेल्या जनावरांसाठी शेतकऱ्यांना मिळणार ‘इतकी’ मदत, जाणून घ्या सविस्तर
- ब्रेकिंग न्यूज : आता शेतकऱ्यांना विहिरींसाठी मिळणार ‘इतक्या’ लाखांचे अनुदान; जाचक अटही रद्द
Web Title: Big Breaking! The state government will waive the loans of these farmers